Join us

लुटीसाठी डोक्यात घातला दगड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 4:09 AM

...मला एकटं राहायचं म्हणत मुलीने सोडलं घर...मुंबई : ''मला एकटं राहायचं आहे. मला शोधण्याचा प्रयत्न ...

...

मला एकटं राहायचं म्हणत मुलीने सोडलं घर...

मुंबई : ''मला एकटं राहायचं आहे. मला शोधण्याचा प्रयत्न करू नका'' अशी चिठ्ठी लिहून १६ वर्षाच्या मुलीने घर सोडल्याची घटना बुधवारी घडली. यापूर्वी ४ ऑगस्ट रोजीदेखील ती निघून गेली होती; मात्र दुसऱ्या दिवशी ती पुन्हा घरी आली. अद्यापही न परतल्याने तिच्या आईने पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार मुलुंड पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे.

...

दुचाकी घेऊन ग्राहक पसार

मुंबई : भाड्याने दिलेली दुचाकी घेऊन ग्राहक पसार झाल्याचा प्रकार गिरगावात समोर आला आहे. याप्रकरणी गुरुवारी टोनी स्वामी (२५) विरोधात व्ही.पी रोड परिसरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश रमेश कोर्लेकर (३३) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

...

८० हजार रुपयांची घरफोडी

मुंबई : क्रॉफर्ड मार्केट येथील सलमा ईस्माईल खान (४०) यांच्या घरातून ८० हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. याप्रकरणी एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत.