‘गोरेगाव पूर्व बस स्थानकात सर्व बेस्ट बसेसना थांबा द्या’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 02:28 AM2019-12-26T02:28:25+5:302019-12-26T02:28:41+5:30
येथे येणाऱ्या बेस्ट बसेस बºयाचदा सोनावाला क्रॉस रोडच्या कोपºयावर उभ्या केल्या जातात.
मुंबई : गोरेगावकर वाहतूककोंडीने हैराण झाले असून, गोरेगाव पूर्व बस स्थानकात प्रवासी उतरण्यासाठी सर्व बेस्ट बसेसना प्रवासी थांबा देण्याची मागणी गोरेगाव प्रवासी संघाने केली. गोरेगाव पूर्व रेल्वे स्थानकाजवळ लीला हॉटेलबाहेर प्रवासी उतरण्यासाठी ३४१, ३४२, ३४७, ३४९, ४५१, ४५२, ४४७ इत्यादी क्रमांकाच्या बसेस थांबविल्या जातात. या बसेसमुळे गोरेगाव बस स्थानक परिसर ते थेट आरे चेक नाक्यापर्यंत मोठी वाहतूककोंडी होते. यामुळे विस्तारीकरण करण्यात आलेल्या बेस्ट बस स्थानकात सर्व बेस्ट बसेसना प्रवासी थांबा द्यावा, अशी आग्रही मागणी गोरेगाव प्रवासी संघाचे अध्यक्ष उदय चितळे यांनी केली आहे. या प्रकरणी बेस्ट समिती अध्यक्ष आणि दिंडोशी बस आगार व्यवस्थापक यांना निवेदन देण्यात आल्याचे चितळे यांनी सांगितले.
येथे येणाऱ्या बेस्ट बसेस बºयाचदा सोनावाला क्रॉस रोडच्या कोपºयावर उभ्या केल्या जातात. त्यामुळे सर्व प्रवासी बसमधून उतरेपर्यंत मागील सर्व वाहने मेराज सिनेमा बाहेर, प्रजापिता ब्रह्मकुमारी चौक या भागात थांबवाव्या लागतात. त्यामुळे दत्त मंदिर चौक, प्रीतम हॉटेलपर्यंत वाहने उभी राहून आरे रोडवर मोठी वाहतूककोंडी निर्माण होते. यावर तोडगा काढण्यासाठी वरील बसथांबा रद्द करून तत्काळ सर्व बसेस गोरेगाव पूर्व बस स्थानकात उभ्या कराव्या, ज्यायोगे गोरेगाव पूर्व भागातील वाहतूककोंडी कमी होईल, असा विश्वास उदय चितळे यांनी व्यक्त केला.