Join us

बोगस पॅथॉलॉजिस्टचा धंदा थांबवा!

By admin | Published: October 30, 2016 1:55 AM

मुंबईसह राज्यात साथीच्या आजारांची साथ पसरलेली आहे. आॅक्टोबर महिना संपत आला तरीही साथीच्या आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. त्याचा फायदा घेत

मुंबई : मुंबईसह राज्यात साथीच्या आजारांची साथ पसरलेली आहे. आॅक्टोबर महिना संपत आला तरीही साथीच्या आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. त्याचा फायदा घेत बोगस पॅथॉलॉजी लॅब रुग्णांना लुबाडतात. त्यांनी दिलेल्या चुकीच्या अहवालामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ होऊ शकतो. मुंबईत फोफावणाऱ्या बोगस पॅथॉलॉजी लॅबला आळा घालण्यासाठी महापालिकेने त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशा आशयाचे पत्र महाराष्ट्र असोसिएशन आॅफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अ‍ॅण्ड मायक्रोबायोलॉजिस्ट दिले आहे. मुंबईत गेल्या काही वर्षांमध्ये बोगस पॅथॉलॉजी लॅबचे जाळे घट्ट विणले गेले आहे. दहावी, बारावी पास असणाऱ्या व्यक्ती तपासणी करुन लोकांची दिशाभूल करत आहेत. हा काळाबाजार रोखण्यासाठी महापालिकेने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मुंबई शहर व उपनगरातील पॅथॉलॉजी लॅबचे सर्वेक्षण करावे. त्यामुळे सत्य उघड होईल असे पॅथॉलॉजिस्टचे म्हणणे आहे. याकडे गांभीर्याने पाहिल्यास रुग्णांची फसवणूक व जीवाशी होणारा खेळ थांबेल असे पॅथॉलॉजिस्टचे म्हणणे आहे. ज्या लॅबमध्ये बोगस पॅथॉलॉजिस्ट असतील त्या लॅबविरुद्ध वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांत तक्रार नोंदवावी. कायद्यानुसार,कारवाई व्हावी, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)