'आधी बारामती अ‍ॅग्रोमधील कॉन्ट्रॅक्ट फार्मींग बंद करा, मग गाझीपूरला जावा'

By महेश गलांडे | Published: February 4, 2021 12:30 PM2021-02-04T12:30:16+5:302021-02-04T12:56:29+5:30

आंदोलकांना कोणी, केव्हा, कसं भेटावं हे ज्यांचा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. पण, सुप्रिया सुळे गाझिपूरला जात असतील तर, अगोदर त्यांनी बारामतीतील कॉन्ट्रॅक्ट फार्मींग बंद करावं, असे आशिष शेलार यांनी म्हटलंय.

'Stop contract farming in Baramati Agro first, then go to Ghazipur', ashish shelar to supriya sule | 'आधी बारामती अ‍ॅग्रोमधील कॉन्ट्रॅक्ट फार्मींग बंद करा, मग गाझीपूरला जावा'

'आधी बारामती अ‍ॅग्रोमधील कॉन्ट्रॅक्ट फार्मींग बंद करा, मग गाझीपूरला जावा'

googlenewsNext
ठळक मुद्देआंदोलकांना कोणी, केव्हा, कसं भेटावं हे ज्यांचा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. पण, सुप्रिया सुळे गाझिपूरला जात असतील तर, अगोदर त्यांनी बारामतीतील कॉन्ट्रॅक्ट फार्मींग बंद करावं, असे आशिष शेलार यांनी म्हटलंय.

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीच्या सीमारेषेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला जगभरातून पाठिंबा मिळत आहे. विदेशातील सेलिब्रिटींनीही ट्विट करुन या आंदोलनसंदर्भात चर्चा केली आहे. तर, देशातील विविध राजकीय पक्षाचे नेतेही सीमारेषेवर जाऊन शेतकरी आंदोलकांची, शेतकरी नेत्यांची भेट घेत आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी दिल्लीच्या सीमारेषेवर जाऊ शेतकरी नेते राकेश टीकेत यांची भेट घेतली होती. आता, गाझिपूर सीमेवर जाऊन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली आहे. या भेटीवरुन भाजपा नेते आशिष शेलार यांनी सुप्रिया सुळेंना टोला लगावला आहे. 

आंदोलकांना कोणी, केव्हा, कसं भेटावं हे ज्यांचा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. पण, सुप्रिया सुळे गाझिपूरला जात असतील तर, अगोदर त्यांनी बारामतीतील कॉन्ट्रॅक्ट फार्मींग बंद करावं, असे आशिष शेलार यांनी म्हटलंय. 'बारामतीमध्ये कॉन्ट्रॅक्ट फार्मींग का करताय, याचं उत्तर अगोदर सुप्रिया सुळेंनी द्यावं. बारामती अ‍ॅग्रोमधील कॉन्ट्रॅक्ट फार्मींग अगोदर बंद करावं, मग आंदोलक शेतकऱ्यांना गाझीपूरला भेटायला जावा, असा टोलाच शेलार यांनी खासदार सुळेंना लगावलाय. शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा केली, मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प, शर्जील उस्मानी, शेतकऱ्यांच आंदोलन आणि विविध मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. 

गाझिपूर सीमेवर विरोधकांचं शिष्टमंडळ गाझिपूर सीमेवर नुकतच पोहोचलं आहे. या शिष्टमंडळात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंचाही समावेश आहे. सुप्रिया सुळे साधणार आंदोलक शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. यावेळी शेतकऱ्यांच्या समस्या आणि त्यांच्या मागण्यांवर ही चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. शिवसेना नेत्यांनंतर आता विरोधकांच्या शिष्टमंडळाने शेतकरी आंदोलकांची भेट घेतली. या शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे, अकाली दलाचे नेते व माजी मंत्री हरसिमरत कौर, डी.एम.के. पक्षाच्या कनिमोझी, तृणमूल काँग्रेसच्या सौगत रॉय आदी नेत्यांचा समावेश आहे. काँग्रेस शिवाय जवळपास 10 विरोधी पक्षाचे 15 पेक्षा जास्त नेते पोहचले आहे.

संजय राऊत यांनीही घेतली होती भेट 

2 फेब्रुवारी रोजी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिल्लीच्या सीमेवर जाऊन शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भेट घेतली होती. यावेळी शिवसेनेच्या शिष्टमंडळात विनायक राऊत,अनिल देसाई, अरविंद सावंत,राजन विचारे, प्रताप जाधव, कृपाल तुमाने आदींचा समावेश होता. त्यानंतर आता विरोधी पक्षांच्या खासदारांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गाझीपूर इथं पोहोचले आहे.


 

Web Title: 'Stop contract farming in Baramati Agro first, then go to Ghazipur', ashish shelar to supriya sule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.