Join us

तासाभरानंतर पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्ववत, नायगाव स्थानकात प्रवाशांनी केला होता रेल रोको

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2017 9:05 AM

पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्ववत झाली आहे. नायगाव रेल्वे स्थानकाजवळ प्रवाशांनी रेल रोको केल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला होता.

मुंबई - पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. नायगाव रेल्वे स्थानकाजवळ प्रवाशांनी रेल रोको केल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला होता. नवीन वेळापत्रकाप्रमाणे काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र याबाबतीच पूर्वसूचना रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली नाही, असा आरोप करत प्रवाशांनी रेल रोको केला.  7.50 वाजताची वसई-अंधेरी लोकल ऐन वेळेस रद्द करण्यात आली. यामुळे नायगावमधील प्रवाशांचा ब-याच दिवसांचा संताप उफाळून आला आणि त्यांनी रेले रोको केला. दरम्यान, यामुळे विरारहून चर्चगेटकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती.  रेल्वे प्रशासनाकडून संतापलेल्या प्रवाशांची मनधरणी करण्यात आल्यानंतर प्रवाशांनी आपले आंदोलन मागे घेतले.

ऑफिस गाठण्याच्या वेळेस लोकलने दगा दिल्याने नायगावमधील प्रवाशांचा संताप अनावर झाला. आपला राग व्यक्त करण्यासाठी प्रवाशांनी थेट ट्रॅकवर उतरुन रेल रोको करण्यास सुरुवात केली. यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती.तब्बल एक तास चर्चगेटकडे येणारी वाहतूक खोळंबली होती. नवीन वेळापत्रकात शनिवार – रविवारी काही गाड्या देण्यात आल्या आहेत, मात्र आज गाड्या रद्द केल्याने प्रवाशांनी रेल रोको केला. सुमारे एक तासापासून आक्रमक झालेल्या प्रवाशांनी लोकल अडवून ठेवल्या होत्या.

टॅग्स :पश्चिम रेल्वेमुंबईआता बास