सापांचे ‘एन्काउंटर’ आता थांबवाच

By admin | Published: August 19, 2015 02:26 AM2015-08-19T02:26:51+5:302015-08-19T02:26:51+5:30

विनाकारण, विनापरवाना सर्प पकडणे वन्यजीव कायद्यानुसार गुन्हा असतानाही अप्रशिक्षित व्यक्ती सर्प पकडत जीव धोक्यात घालत आहेत

Stop Snake 'Encounter' | सापांचे ‘एन्काउंटर’ आता थांबवाच

सापांचे ‘एन्काउंटर’ आता थांबवाच

Next

मुंबई : विनाकारण, विनापरवाना सर्प पकडणे वन्यजीव कायद्यानुसार गुन्हा असतानाही अप्रशिक्षित व्यक्ती सर्प पकडत जीव धोक्यात घालत आहेत. दुसरीकडे मांडूळ या सर्पाची मंत्रतंत्रासाठी तस्करी केली जात आहे. सर्पाच्या कातडीला मागणी असल्याने त्यांचा जीव धोक्यात आला आहे. सर्पाचे विष विकण्यासह स्टंट करण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. त्यामुळे सर्पांच्या प्रजाती नष्ट होऊ लागल्या असून, त्यांच्या रक्षणासाठी मानव अभ्यास संघाने विशेष मोहीम हाती घेत सर्पांचे ‘एन्काउंटर’ थांबवा, अशी हाक दिली आहे.
सर्पांच्या जगभरात २ हजार ५०० प्रजाती आहेत. भारतात त्यापैकी सुमारे २७८ प्रजाती आहेत. मात्र नागपंचमीला सर्पांचा बळी घेतला जात आहे. नागपंचमीला सर्पांना पकडून त्यांची पूजा केली जात आहे. गारुडी सर्पांना पकडून त्यांचे दात तोडत आहेत, तर कधी तोंड शिवण्याचेही प्रकार होत आहेत. कधी लोखंडी सळई सर्पाच्या तोंडात घालून त्यांच्या विषग्रंथी जाळल्या जातात. अन्नपाण्याविना सर्पांचे हाल केले जातात. अर्धमेल्या सर्पांना दूध पाजण्याचे प्रकार सर्रास होतात. मुळात दूध पिण्यास सर्प शाकाहारी प्राणी नाही.
सर्प मांसाहारी आहे. सर्प कधीच मेलेले भक्ष्य खात नाही. पाल, सरडे, बेडूक, पक्षी हे त्यांचे खाद्य आहे. मात्र सर्पांना दूध पाजल्याने त्यांचे अपचन होते. त्यामुळे सर्पांना फुप्फुसाचे विकार होतात आणि त्यात त्यांचा मृत्यूही ओढावतो. अंधश्रद्धा आणि गैरसमजातून होणाऱ्या प्रकारांबाबत जनजागृती करण्यासाठी संघाने मोहीम हाती घेतली असून, त्यासाठी प्रतिज्ञाही तयार करण्यात आली आहे.

Web Title: Stop Snake 'Encounter'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.