हिंमत असेल तर बिल्डरांची कामे थांबवा; प्रदुषणावरून आदित्य ठाकरेंचं सरकारला चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 04:26 PM2023-11-09T16:26:47+5:302023-11-09T16:27:19+5:30

मुंबईतील वाढत्या प्रदुषणावरून आदित्य ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला.

Stop the builders' works if you dare; Aditya Thackeray's challenge to the government on pollution | हिंमत असेल तर बिल्डरांची कामे थांबवा; प्रदुषणावरून आदित्य ठाकरेंचं सरकारला चॅलेंज

हिंमत असेल तर बिल्डरांची कामे थांबवा; प्रदुषणावरून आदित्य ठाकरेंचं सरकारला चॅलेंज

मुंबई - शहरात जी बांधकामे सुरू आहेत, त्यामुळे धुळीचे साम्राज्य वाढले आहे. ज्याप्रकारे नियोजन व्हायला हवं तसे होत नाही. नगरविकास मंत्र्यांना त्यांचे खाते चालवायचे कसे हे कळत नाही. मुंबईत सगळीकडे बांधकामे सुरू आहेत. कुठल्याही बांधकामांना हिरवे पडदे लावले नाहीत. स्प्रिंकलर्स लावले नाहीत. पालकमंत्रीच एक बिल्डर आहे त्यामुळे सरकारकडून दुसरी अपेक्षा काय ठेवणार? हिंमत असेल तर पुढील १५ दिवस बिल्डर, कंत्राटदारांची कामे रोखून दाखवा असं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी सरकारला दिले आहे.

मुंबईतील वाढत्या प्रदुषणावरून आदित्य ठाकरेंनी निशाणा साधला. ते म्हणाले की, काही लोकांना सर्दी, खोकला झालाय, प्रत्येकाला धुळीची एलर्जी सुरू झालीय. प्रदुषणावर आमचे सरकार असताना अनेक गोष्टी केल्या. मविआ सरकार असताना आरे जंगल घोषित केले. ईव्ही पॉलीसी आणली, परंतु खोके सरकार आल्यापासून ते बंद करण्यात आले. आज महाराष्ट्रात पर्यावरण मंत्री नाही ही गंभीर बाब आहे. पर्यावरणावर कुणी उत्तर दिलंय काय?, मुंबईत सगळीकडे धुके दिसतायेत, वेगवेगळी कारणे महापालिका आयुक्तांकडून दिली जातेय, ही कारणे खोटी आहे. आम्ही मुंबई क्लायमेंट एक्शन प्लॅन बनवला होता. त्यानुसार कामे सुरू होती. मुंबईत जी बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे धुळीचे प्रमाण वाढले आहे. जिथे जिथे कामं सुरू आहेत तिथे गाईडलाईन्स पाळली जात नाही असा आरोप त्यांनी केला.

तसेच आज मेट्रो काम थांबवले, जनतेची कामे थांबवण्यापेक्षा जे बिल्डर, कंत्राटदार तुमचे सरकार चालवत आहे त्यांची कामे थांबवा. प्रदुषण हे बिल्डरच्या साईटवरून येतंय. जोपर्यंत बिल्डर गाईडलाईन्स पाळत नाही तोवर काम थांबवून दाखवा. १ हजार टँकरमध्ये पाणी भरणार कुठून? महाराष्ट्रात पाण्याचा दुष्काळ असताना १ हजार टँकर्समधून पाणी आणणार कुठून? मुंबईकरांचे खच्चीकरण का चाललंय? असा प्रश्नही आदित्य ठाकरेंनी विचारला.

दक्षिण मुंबईतील रस्त्याचं कंत्राट रद्द

शहरात मेगा रोड स्कॅम मी जनतेसमोर आणला होता. घटनाबाह्य मुख्यमंत्री जे बोलतायेत ते खोटे बोलतायेत. गेल्या ऑगस्ट २०२२ मध्ये ५ हजार कोटींचे कंत्राट दिले गेले. परत ते रद्द झाले, ते कंत्राट हजार कोटींनी वाढवून ६ हजार कोटींचे केले. कंत्राटदार मित्रांना फायदा करण्यासाठी टेंडर दिले गेले. जानेवारीपासून ३१ मे पर्यंत कुठेही कामाची सुरुवात झाली नाही. पावसाळा निघून गेला तरी कामे होतच नाही. २१-२२ वर्षाची जी कामे आहेत त्यालाही सुरुवात झाली नाही. ६ हजार कोटींची कामे दिली परंतु प्रत्यक्षात रस्त्याची कामेच नाही. मी सातत्याने याबाबत विचारणा करतोय, त्यात १६८० कोटींची कामे दिलेल्या कंत्राटदारांला आमच्या दबाव्यामुळे निलंबित केले गेले. दक्षिण मुंबईत या कंत्राटदारांना कामे दिल होती असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं.

त्याच कंत्राटदाराला बीएमसी काम देणार का?

प्रशासक म्हणून बसला आहात, पण तुम्हाला मुंबई जाणून घ्यावी लागेल. दक्षिण मुंबईतील कंत्राट रद्द झाल्यानंतर आता किती दिवसात दुसरे टेंडर निघणार? कामे सुरू झालीत त्याला जबाबदार कोण? आज कुछ तुफानी करते है असं म्हणते धडाक्याने सुरुवात केली पण कामं सुरू झाले नाही. पूर्व उपनगरात ९२० कोटींची कामे दिली गेली, तो कंत्राटदार कोण आहे ते बघा, त्याच कंत्राटदाराने बनवलेला चिपळूणचा पूल कोसळला, त्याच कंत्राटदाराला बीएमसी काम देणार का? असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारत आमचे सरकार आल्यानंतर या रस्ते घोटाळ्यात जे कुणी जबाबदार असतील त्यांना जेलमध्ये टाकणारच. महाराष्ट्रात भाजपाप्रणित घटनाबाह्य सरकार जनता घालवल्याशिवाय राहणार नाही. कंत्राटदाराकडून दंड घेतला जाणार, पण त्याला बीएमसीकडून पेमेंट झाल्यानंतर दंड घेणार, याचा अर्थ जनतेच्या खिशातूनच दंड भरला जाणार आहे असं सांगितले.

Web Title: Stop the builders' works if you dare; Aditya Thackeray's challenge to the government on pollution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.