Join us

तरुणाईची वेगाची झिंग उतरवा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 2:47 AM

चार दिन की जिंदगी है जनाब और आज चौथा दिन है... असे म्हणत तरुणाई सर्रास बाइक रेसिंग करताना दिसते.

चार दिन की जिंदगी है जनाब और आज चौथा दिन है... असे म्हणत तरुणाई सर्रास बाइक रेसिंग करताना दिसते. काही हजार रुपयांच्या बेटिंगसाठी ही तरुणाई अन्य नागरिकांचाही जीव धोक्यात घालत असते. अर्थात या प्रकरणाला अनेक घटक जबाबदार आहेत. स्वस्तात उपलब्ध होणारी दुचाकी, पालकांचे मुलांकडे होणारे दुर्लक्ष, कारवाईबाबत प्रशासनाकडून होणारी चालढकल यामुळे बाइक रेसिंग करणाऱ्या तरुणाईचे फावत असते. अशा प्रकरणांना आळा घालण्यासाठी वाहतूक पोलीस, प्रादेशिक परिवहन कार्यालय यांनी वारंवार संयुक्त कारवाई करणे आवश्यक आहे. अशा प्रसंगांतून बचावलेल्या किंवा बाइक रेसिंगमुळे कायमचे अपंगत्व आलेल्यांच्या प्रतिक्रिया याबाबतची गंभीरता अधोरेखित करतात.स्टंट करणाºयांना आवरा, जनतेचा जीव सावराआजकालचे बाइकस्वार विमान चालविल्यासारखे बाइक चालवतात. नुकतेच बाइक चालवायला शिकलेली तरुणाई स्टंट करण्यात आघाडीवर दिसते. त्यामुळे अपघात घडतात. अनेक रस्त्यांवर बाइकस्वार रेसिंगमध्ये सहभागी झाल्यासारखे दुचाकी चालवतात. ट्रॅफिकमधून झिग-झॅग बाइक चालवून अनेकांच्या जिवाशी खेळ करतात. यामुळे अशा दुचाकीस्वारांवर कडक कारवाई करून त्यांना कठोर शिक्षा करावी. स्टंट करणाºयांना आवरा, जनतेचा जीव सावरा, अशी संबंधित प्रशासनाला माझी विनंती आहे.- संदेश दत्तात्रय मेस्त्री,अंधेरी.जीवन अनमोल आहे याची जाणीव हवीकाही वर्षांपासून मुंबई-पुणे, मुंबई-नाशिक महामार्गांवर अनेक बाइक रायडर्स आपला विकेंड साजरा करताना दिसतात, तर मुंबईत वांद्रे-बँड स्टॅण्ड, रुईया महाविद्यालयामागील रस्ता या ठिकाणी अनेक रायडर्सच्या स्पर्धा चालतात. पण हे सगळे करताना किमान इतरांच्या जीवनाशी खेळ होणार नाही याचे भान बाळगणे आवश्यक आहे. अनेक वेळा अपघात होऊन एकतर आयुष्याचे नुकसान होते किंवा दुर्दैवाने मृत्यू ओढावतो. नुकताच मुंबई-अहमदाबाद मार्गावर एका अपघातात सुप्रसिद्ध तरुण महिला रायडर्सचा मृत्यू झाला. तेव्हा बाइक रायडिंगचा आनंद घेताना वेगाचे भान हे तरुणाईने बाळगायलाच हवे, शेवटी आपला किंवा इतरांचा जीव हा अनमोल आहे, याची जाणीव ठेवायला हवी.- अनंत बोरसे, शहापूरप्रशासनाने कडक भूमिका घ्यावीतरुणांमध्ये रेसिंगचे आकर्षण दिवसेंदिवस वाढत आहे. हे फार धोकादायक असून या गोष्टीला आळा घालण्याची गरज आहे. त्याकरिता पोलीस व प्रशासनाने कडक भूमिका घ्यावी. तसेच तरुणांना योग्य मार्गदर्शन करावे. जेणेकरून भविष्यात असे प्रकार होणार नाहीत.- उदय वाघवणकर, जोगेश्वरीअशा तरुणाईला तरुणांनीच आवर घालणे गरजेचेरेसिंग करणाºया तरुणाईला इतर तरुणांनी आवर घालणे गरजेचे आहे. दुचाकी झिग-झॅगपणे चालविणे, स्टंट करणे, हवेत दुचाकी उडविणे हे स्टंट चित्रपटांत योग्य त्या सुरक्षेसह आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली होतात. मात्र रस्त्यांवर कोणत्याही सुरक्षेविना करण्यात येणारे स्टंट हे जीवघेणेच आहेत. ‘लगी बेट’ या शब्दांच्या आहारी जाणे हे त्याहूनही भयंकर. काही मिनिटांच्या मनोरंजनासाठी आयुष्यभर अपंगत्व येऊन स्वत:सह कुटुंबीयांनादेखील नाहक परिणाम भोगावे लागतात. जीवनात चॅलेंज स्वीकारणे हे चांगले; मात्र ते जिवावर बेतणारे नसावे.- प्रमोद पावसकर, विरारवाहन परवाना रद्द कराविदेशात बाइक रेसिंग म्हणजे साहसी क्रीडा प्रकार; पण आपल्या येथे मात्र त्याचा दुरुपयोग होताना दिसतो. तरुणाईच्या हातात एकदा बाइक मिळाली की आपणास विमानच चालवायला मिळाले असे त्यांना वाटते. काही तरुण चित्रपटाप्रमाणे किंबहुना विदेशातील बाइक रेसिंग पाहून तशी बाइक चालविण्याचे जीवघेणे धाडस करतात. तथापि ही रेसिंग आपण कोठे करतो याचे त्यांना भान नसते, ना त्यांना आपल्या जिवाची पर्वा असते ना पादचारी प्रवाशांच्या. या रेसिंगमध्ये आतापर्यंत अनेक तरुणांचे बळी गेले आहेत. लोकांचे लक्ष आपल्याकडे कसे वेधून घेता येईल हेच ते पाहत असतात. या बाइक रेसिंग करणाºयांना वेळीच रोखणे हे वाहतूक पोलिसांचे काम आहे. किंबहुना अशा रेसिंगवाल्या तरुणांना पकडल्यानंतर परिवहन विभागाने त्यांचा वाहन परवानाच कायमचा जप्त करायला हवा. - अरुण खटावकर, लालबागसमन्वयाने कारवाई करा!आजकालच्या तरुणाईमध्ये अधिक स्मार्टपणा आलेला आहे. यामुळे ही पिढी वेग आणि विचारशून्य धाडसाच्या विळख्यात सापडली आहे. अगदी दहा-बारा वर्षांचे तरुण, तरुणीसुद्धा दुचाकी बिनधास्तपणे चालवताना दिसतात. पण दुर्दैवाने जर काही दुर्घटना घडली तर त्याच्या दुष्परिणामांची त्यांना कल्पना नसते. काही हजारांच्या रेसिंगसाठी जीव धोक्यात घालणाºया तरुणाईला जरब बसविण्यासाठी वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) यांनी संयुक्तपणे कारवाई केली पाहिजे. त्याचबरोबर महाविद्यालयीन परिसरात जीवघेण्या रेसिंगबाबत जनजागृती मोहीम राबविणे आवश्यक आहे.- नरेश राऊत, मुलुंड

टॅग्स :मुंबईबातम्या