एसटीतील कर्मचाऱ्यांसाठी आता स्वेच्छा सेवानिवृत्तीचा ‘थांबा’

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 06:19 AM2020-12-10T06:19:11+5:302020-12-10T06:20:35+5:30

ST News : वयाची पन्नाशी गाठलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी स्वेच्छासेवानिवृत्ती घ्यावी, यासाठी महामंडळाने तयारी सुरू केली आहे. या कर्मचाऱ्यांकडून संमतीपत्र भरून घेतले जाणार आहे.

'Stop' voluntary retirement for ST employees | एसटीतील कर्मचाऱ्यांसाठी आता स्वेच्छा सेवानिवृत्तीचा ‘थांबा’

एसटीतील कर्मचाऱ्यांसाठी आता स्वेच्छा सेवानिवृत्तीचा ‘थांबा’

googlenewsNext

 यवतमाळ / मुंबई : वयाची पन्नाशी गाठलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी स्वेच्छासेवानिवृत्ती घ्यावी, यासाठी महामंडळाने तयारी सुरू केली आहे. या कर्मचाऱ्यांकडून संमतीपत्र भरून घेतले जाणार आहे. त्यांनी होकार द्यावा याकरिता समन्वयाची जबाबदारी महामंडळाच्या अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. या परिपत्रकामुळे महामंडळाच्या २७ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.

महामंडळ स्वेच्छासेवानिवृत्ती योजना राबविणार असल्याची हवा मागील काही महिन्यांपूर्वीच  झाली होती. आता त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. 
८ डिसेंबर रोजी महाव्यवस्थापक शैलेंद्र चव्हाण यांनी परिपत्रक जारी केले आहे. हे परिपत्रक विभाग, आगार, घटक स्तरावील सूचना फलकांवर लावले जाणार आहे. ५० वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना योजना समजावून सांगितली जाणार आहे. संमतीपत्र भरून दिले म्हणजे त्यांची स्वेच्छासेवानिवृत्ती मंजूर झाली, असे समजण्यात येऊ नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. 

कर्मचाऱ्यांमध्ये वेगवेगळे मतप्रवाह
  या योजनेविषयी कर्मचाऱ्यांत वेगवेगळे मतप्रवाह आहेत. स्वेच्छासेवानिवृत्ती घेतल्यानंतर पगार बंद होईल. गरजेच्या वेळी कुठल्याही संस्थेकडून 
कर्ज उपलब्ध होणार नाही. 
पेन्शन नसल्याने मिळालेल्या पैशांतूनच गुजराण करावी लागेल. घरातील कार्यप्रसंग, शिक्षण करण्याची जबाबदारी याच वयात पार पाडावी लागते. अशा वेळी योजना स्वीकारायची की नाकारायची याविषयी वेगवेगळी मते मांडली जात आहेत.

 अशी आहे योजना 
 अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ३० जूनपर्यंत वयाची ५० वर्षे पूर्ण असावीत. 
 काम केलेल्या प्रत्येक वर्षासाठी तीन महिन्यांचे वेतन मिळेल.
 मूळ वेतन व महागाई भत्त्याचा समावेश. 
 नियमित सेवानिवृत्तीनंतरचे लाभ नियमानुसार मिळणार.
 मोफत कौटुंबिक पासची योजना लागू 
 स्वेच्छानिवृत्ती मंजूर/नामंजूर करण्याचे अधिकार महामंडळाकडे असतील. 

Web Title: 'Stop' voluntary retirement for ST employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.