बोईसरच्या रहिवाशांचा रास्ता रोकोचा इशारा
By Admin | Published: December 6, 2014 10:23 PM2014-12-06T22:23:43+5:302014-12-06T22:23:43+5:30
बोईसर ग्रामपंचायतीला खडबडून जाग येऊन सर्व कामे सुरू करून तसे लेखी आश्वासन दिल्याने आजचा नियोजित रास्ता रोको रद्द करण्यात येऊन रस्ता बाध्ांणीचे उद्घाटनही करण्यात आले.
बोईसर : बोईसर येथील सर्वात मोठी बाजारपेठ व नागरी संकुल असलेल्या ओस्तवाल एम्पायरमधील त्रिमुर्ती सांस्कृतीक युवा मंडळाने रस्त्यांवरील लाईट, दुर्दशा झालेल्या रस्त्यांची बांधणी व रस्त्यावर अस्ताव्यस्त साठणारा कचरा नियमित उचलावा या व इतर मागण्यांसाठी रास्ता रोकोचा इशारा देताच बोईसर ग्रामपंचायतीला खडबडून जाग येऊन सर्व कामे सुरू करून तसे लेखी आश्वासन दिल्याने आजचा नियोजित रास्ता रोको रद्द करण्यात येऊन रस्ता बाध्ांणीचे उद्घाटनही करण्यात आले.
त्रिमुर्ती सांस्कृतिक मंडळाने मार्च 2क्12 पासून अनेक वेळा त्यांच्या मुख्य मागणीकरीता बोईसर ग्रामपंचायतीशी पत्रव्यवहार करूनही दुर्लक्ष होत असल्रूाने अखेर आज ओस्तवाल एम्पायर येथील मुख्य प्रवेशद्वाराजवळील बोईसर -तारापूर रस्त्यावर रास्ता रोको आंदेालन त्रिमुर्ती मंडळातर्फे करण्यात येणार होते. आंदोलनाचा इशारा देताच बोईसर पेालीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी संबंधितांच्ी बैठक 3 डिसेंबर रोजी बोलावून चर्चा घडवून आणल्यानंतर 4 डिसेंबर रोजी प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून रोड लाईटचे कामही त्वरित सुरू केले.
शुक्रवारी रस्त्याच्या दुरूस्तीचे उद्घाटन करण्यात आले त्यावेळी एपीआय महेश पाटील, त्रिमुर्ती सांस्कृतीक मंडळाचे अध्यक्ष अनंत दळवी, पदाधिकारी जितेंद्र देशमुख, जयेश म्हात्रे, राजेश पाटील, दिनेश माळी यांच्यासह उपसरपंच निलम संखे, राष्ट्रवादीचे संजय पाटील, वैभव संखे, अशोक वडे, प्रशांत संखे, शेट्टी यांच्यासह नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)