अपंगांचा रास्ता रोको, ठिय्या

By admin | Published: February 10, 2016 04:12 AM2016-02-10T04:12:39+5:302016-02-10T04:12:39+5:30

श्रीमंत मुंबई महापालिकेने आपल्या अर्थसंकल्पातून अपंगांची मात्र घोर निराशा केली आहे़ याविरोधात अपंगांनी आज महापालिका मुख्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करीत सत्ताधारी व प्रशासनाविरोधात

Stop the way of handicapped, strain | अपंगांचा रास्ता रोको, ठिय्या

अपंगांचा रास्ता रोको, ठिय्या

Next

मुंबई : श्रीमंत मुंबई महापालिकेने आपल्या अर्थसंकल्पातून अपंगांची मात्र घोर निराशा केली आहे़ याविरोधात अपंगांनी आज महापालिका मुख्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करीत सत्ताधारी व प्रशासनाविरोधात निदर्शने केली़ अर्थसंकल्पात सुधारणा करताना अपंगांसाठी निधी राखून न ठेवल्यास महापौर बंगल्यात घुसून आंदोलन करणार असल्याचा इशारा अपंगांनी दिला आहे़
राज्य सरकारच्या परिपत्रकानुसार प्रत्येक अर्थसंकल्पात अपंगांसाठी तीन टक्के निधी राखून ठेवणे बंधनकारक आहे़ ही बाब महिन्याभरापूर्वीच पत्राद्वारे पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणण्यात आली होती, परंतु अर्थसंकल्पात मात्र अपंगांच्या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या़ यामुळे संतप्त अपंगांनी ‘प्रहार अपंग क्रांती आंदोलन’ संघटनेच्या नेतृत्वाखाली पालिका मुख्यालयासमोर आज दोन वेळा रास्ता रोको केला़
अखेर पोलिसांच्या विनंतीनुसार अपंगांनी रास्ता रोको न करता पालिका मुख्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले़ आंदोलक माघार घेत नसल्यामुळे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी अपंगांच्या शिष्टमंडळाला बोलाविले़ तरीही आंदोलकांनी मुख्यालयाचे द्वार सोडण्यास नकार दिल्यामुळे या संदर्भात ८ मार्चला बैठक घेण्याचे लेखी आश्वासन प्रशासनाने दिले़ त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले़ (प्रतिनिधी)

अन्यथा महापौर बंगल्यात घुसणार
अपंगांसाठी अर्थसंकल्पातील तीन टक्के निधी राखून ठेवण्याचे राज्य सरकारचे आदेश आहेत़ तरीही २०१६-२०१७ च्या अर्थसंकल्पातून अपंगांच्या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत़ सुधारित अर्थसंकल्पात विशेष तरतूद न केल्यास महापौर बंगल्यात घुसून आंदोलन करू, असा इशारा अपंगांच्या संघटनेने दिला आहे़.

अशा आहेत मागण्या
जन्म-मृत्यू नोंदणीप्रमाणे अपंगांची नोंद व्हावी़ १९९५ चा अपंग व्यक्ती कायदा आहे तसाच राबवण्यात यावा.
भूखंड निवासी व व्यापारी गाळे वाटपामधील १९९६ पासूनचा अनुशेष तीन टक्क्यांप्रमाणे भरून काढावा़
अपंगांच्या तीन टक्के निधीचे नियंत्रण करण्याकरिता जिल्हा व तालुकास्तरावर समिती स्थापन करून त्यात अपंगांना स्थान द्यावे़
अपंगांच्या विविध योजना राबविण्यासाठी प्रभागनिहाय अधिकारी नेमावा़

Web Title: Stop the way of handicapped, strain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.