मुंबई : मुसळधार पावसामुळे सलग चौथ्या दिवशी मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले. सलग तीन दिवस मुंबई शहर आणि उपनगरात कोसळलेल्या मुसळधार पावसाने मंगळवारीही आपला जोर कायम ठेवला.पाऊस काही थांबता थांबण्याची चिन्हे दिसत नव्हती.पुरामुळे वसई रोड व नालासोपारा स्टेशनदरम्यान शताब्दी, राजधानी एक्स्प्रेससह अनेक गाड्या सकाळपासूनअडकल्या. त्यातील प्रवाशांना खाद्य पदार्थ देण्यासाठी लष्कराला पाचारण केल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रविंद्र भाकर यांनी सांगितले. नालासोपारा ते वसई दरम्यान पुराच्या पाण्यात अडकलेल्या बडोदा एक्स्प्रेसमधील सुमारे दोन हजार प्रवाशांची पालघर जिल्हा प्रशासनाने एनडीआरएफच्या जवानांच्या मदतीनेसुटका केली. त्यांना नायगाव स्टेशनपर्यंत खासगी बसने सोडण्यात आले. त्यांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर पाणी आल्याने एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान घसरले.त्यामुळे विमान वाहतुकीवरही परिणाम झाला. १४० विमाने सरासरी २२ मिनिटे उशीराने उतरली तर २७१ विमानांच्याउड्डाणालाही विलंब झाला. २४ तासांत मुंबईत तब्बल १८४.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दादर, भायखळा, लालबाग, माटुंगा व सायन परिसर जलमय झाल्याने या भागातील रस्ते वाहतूक बंद करण्यात आली होती. तर सायन, कुर्ला रेल्वे मार्गावर पाणी आल्याने सकाळी लोकल खोळंबल्या. ठाणे जिल्ह्याला पावसाने मोठा तडाखा दिला....तर रेल्वेचे खासगीकरण करारेल्वे रूळ पाण्याखाली जाऊन दरवर्षी सेवा ठप्प होते. लोकांचेहाल होतात. रेल्वेला हा व्याप झेपत नसेल तर त्यांनी विमानसेवेप्रमाणे रेल्वेचे खासगीकरण करावे, अशी उच्च न्यायालयानेमंगळवारी रेल्वे प्रशासनाला चपराक लगावली.कर्जतमध्ये शेतकरी बुडालाकर्जतमध्ये शेतकरी राघो आंबो दरवडा (५२) यांचा पाण्यातवाहून गेल्याने मृत्यू झाला तर मालाड पश्चिमेकडील व्हॅनिलातलावात संतोष तुकाराम कांबळे हे बुडाले.खबरदारी म्हणून वीजपुरवठा खंडितसंततधार पावसामुळे, वसईविरार भागाला वीजपुरवठा करणाऱ्या महापारेषण वसई, अति उच्च दाब केंद्राच्या नियंत्रण कक्षामध्ये पावसाचे पाणी शिरल्याने खबरदारी म्हणून महावितरणने मंगळवारी सकाळी परिसरातील वीजपुरवठा खंडित केला होता.बुडून मृत्यूमालाड पश्चिमेकडीलव्हॅनिला तलावात सोमवारीरात्री साडेअकराच्या सुमाराससंतोष तुकाराम कांबळे नावाचीव्यक्ती बुडाली. अग्निशमनदलाने त्यांस बाहेर काढूनमालाड येथील जनरलरुग्णालयात दाखल केले.मात्र उपचारादरम्यान त्यांचामृत्यू झाला.वसई-विरार रेल्वेमार्गपाण्याखाली गेल्यामुळेशताब्दी, राजधानी आणिदुरांतो एक्स्प्रेससह एकूण५० मेलना फटका बसला.त्यामुळे प्रवाशांचे मोठ्याप्रमाणात हाल झाले.इशारा११ जुलै रोजी पालघरजिल्ह्यात तुरळक ठिकाणीअतिवृष्टी होईल. १२ ते १४जुलैदरम्यान पालघर जिल्ह्याततुरळक ठिकाणी मुसळधारपाऊस पडेल.११ जुलैला तुरळकठिकाणी मुंबईत अतिमुसळधार पाऊस पडेल, तरठाणे जिल्ह्यात तुरळकठिकाणी अतिवृष्टी होईल.१२ ते १४ जुलैदरम्यानमुंबई आणि ठाणे जिल्ह्याततुरळक ठिकाणी मुसळधारपाऊस पडेल, रायगडनालासाप्े ाारा जिल्ह्यात अतिवष्टृ ी होइलर्् ा.
पाऊस थांबता थांबेना! पालघरमध्ये पूरस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 6:37 AM