Join us

ऑक्सिजन उत्पादन क्षमतेच्या ९५ टक्क्यांपर्यंत एलएमओ साठवून ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाच्या संभावित तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (एलएमओ) अर्थात वैद्यकीय प्राणवायू कमी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या संभावित तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (एलएमओ) अर्थात वैद्यकीय प्राणवायू कमी पडू नये, यासाठी त्याची साठवणूक करून ठेवण्यासंबंधी राज्य शासनाने उत्पादकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

या अनुसार राज्यातील सर्व एल. एम. ओ. उत्पादन करणाऱ्या कंपनी आणि प्राणवायू पुनर्भरण करणाऱ्यांनी ३० सप्टेंबरपर्यंत आपल्या क्षमतेच्या ९५ टक्क्यांपर्यंत साठवणूक करावी आणि पुढील आदेश येईपर्यंत ऑक्सिजन साठ्यासंबंधी या अटीचे पालन करण्याची सूचना केली आहे. सर्व उत्पादकांना निर्देश देण्यात आले आहेत की, त्यांच्या प्रकल्पामध्ये एलएमओ उत्पादन पूर्ण क्षमतेने केले जात आहे का याकडे लक्ष द्यावे व शहानिशा करून घ्यावी. जिल्हाधिकाऱ्यांनी खात्री करावी की, जिल्ह्यामध्ये सर्व एलएमओ उत्पादक साठवणूक (दोन्ही सार्वजनिक आणि खासगीमध्ये) करत आहेत आणि जास्तीत जास्त प्राणवायू साठवणुकीची पातळी टिकून राहील, असे निर्देश देण्यात आले आहेत.