मुंबईत वादळ येणार ही निव्वळ अफवा! महापालिकेने केले स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2017 01:24 PM2017-09-20T13:24:28+5:302017-09-20T17:05:59+5:30
मुंबईत दुपारी तीनच्या सुमारास वादळ धडकणार असल्याचा सोशल मीडियावर व्हायरल झालेले मेसेज निव्वळ अफवा आहे.
मुंबई, दि. 20 - मुंबईत दुपारी तीनच्या सुमारास वादळ धडकणार असल्याचा सोशल मीडियावर व्हायरल झालेले मेसेज निव्वळ अफवा आहे. मुंबईत असे कुठलेही वादळ धडकणार नसून नागरीकांनी हा मेसेज फॉरवर्ड करु नये तसेच कुठल्याही अफवेवर विश्वास ठेऊ नये असे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. महापालिकेने टि्वट केले असून, त्यात भारतीय हवामान विभागाचा हवाला दिला आहे.
As informed by IMD there is no cyclone warning for Mumbai. Citizens r requested not to spread & trust rumour-DMU
— Disaster Management (@DisasterMgmtMum) September 20, 2017
दुपारी तीनला वादळ धडकणार असल्याने वांद्रे-वरळी सीलिंक, पेडर रोड बंद आहे. सायन ब्रीज बंद असून वाहनांना माघारी पाठवण्यात येत आहे. पावसामुळे वांद्रे ते सांताक्रूझपर्यंत एसव्हीरोड बंद आहे अशा प्रकारचा मेसेज फेसबुक, व्हॉटस अॅपवर फिरत आहेत.
हा मेसेज पूर्णपणे चुकीचा आहे. नागरीकांना घाबरवण्यासाठी अफवा पसरवली जात आहे. त्यामुळे नागरीकांनी विश्वास ठेऊ नये असे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.