‘कथा अरुणाची’ पाठ्यपुस्तकात?

By Admin | Published: May 23, 2015 01:31 AM2015-05-23T01:31:42+5:302015-05-23T01:31:42+5:30

अरुणा शानबाग यांची चार दशकांची मृत्यूशी झुंज व केईएम रुग्णालयातील परिचारिकांचे नि:स्वार्थ सेवाव्रत, हा आदर्श येणाऱ्या पिढीला कळावा यासाठी अरुणा यांचा धडा पाठ्यपुस्तकात घ्यावा,

Story of 'Aruna' textbook? | ‘कथा अरुणाची’ पाठ्यपुस्तकात?

‘कथा अरुणाची’ पाठ्यपुस्तकात?

googlenewsNext

मुंबई : अरुणा शानबाग यांची चार दशकांची मृत्यूशी झुंज व केईएम रुग्णालयातील परिचारिकांचे नि:स्वार्थ सेवाव्रत, हा आदर्श येणाऱ्या पिढीला कळावा यासाठी अरुणा यांचा धडा पाठ्यपुस्तकात घ्यावा, याकरिता राज्य शासनाने अनुकूलता दर्शवली आहे.
हा विषय गंभीर असून, याबाबत योग्य तो निर्णय घेण्याचे अधिकार शिक्षण मंडळाकडे आहेत. त्यामुळे शानबाग यांचा धडा पाठ्यपुस्तकात घेण्याबाबत या मंडळाकडे सूचना पाठवण्यात येईल. मंडळाने यास हिरवा कंदील दाखवला तर राज्य शासनही याला परवानगी देईल, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
शानबाग या मृत्यूशी झुंज देत होत्या. सोमवारी अरुणा यांची प्राणज्योत मालवली. हा चार दशकांचा कालखंड येणाऱ्या पिढीला कळावा यासाठी अरुणा यांचा धडा पाठ्यपुस्तकात असावा, याकरिता डॉ. सुपे, डॉ. विजया वाड व सामाजिक कार्यकर्त्या स्वाती पाटील यांनी सकारात्मक भूमिका मांडली होती. शानबाग यांचा संघर्ष व परिचारिकांचे सेवाव्रत येणाऱ्या पिढीला प्रेरणादायी ठरेल, असेही त्यांनी आवर्जून सांगितले होते.

६वीच्या अभ्यासक्र मात ..
पाचवीचा अभ्यासक्रम बदलला असून, पुस्तकेही बाजारात आली आहेत. त्यामुळे यंदा अरुणा शानबाग यांचा धडा पाठ्यपुस्तकात येणे अशक्य आहे. २0१६-१७ या शैक्षणिक वर्षात सहावीच्या अभ्यासक्रमात अरुणाविषयीच्या नि:स्वार्थ सेवाव्रताचा अभ्यासक्रमात समावेश होऊ शकतो. यासाठी अभ्यास मंडळाकडून हिरवा कंदील मिळणे गरजेचे आहे.

Web Title: Story of 'Aruna' textbook?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.