दमलेल्या बाबाची कहाणी; मुलाला वाचवण्यासाठी मुंबईत पोहोचले, रस्त्यावरच झोपले!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 06:57 AM2020-01-07T06:57:59+5:302020-01-07T11:31:49+5:30
घरची परिस्थिती हलाखीची. मोलमजुरी करून मुलाचे शिक्षण पूर्ण केले.
मनीषा म्हात्रे
मुंबई : घरची परिस्थिती हलाखीची. मोलमजुरी करून मुलाचे शिक्षण पूर्ण केले. वृद्धापकाळात आधार असलेल्या मुलाने शिक्षण पूर्ण झाल्याने नोकरीसाठी परदेशात जाण्याचा हट्ट धरत मुंबई गाठली. मात्र दैवाने त्याच्या नशिबात काही वेगळेच लिहून ठेवले होते. नोकरीच्या पहिल्याच दिवशी मुलाला भरधाव कारने उडवल्याची बातमी कानावर पडली आणि आई- बापाच्या काळजाचा ठोकाच चुकला. मुलासाठी ६० वर्षांच्या बापाने रातोरात मुंबई गाठली. मात्र मायानगरी मुंबईतील जगण्याच्या वास्तवाचे चटके त्यांना सोसावे लागत आहेत. मध्य प्रदेशच्या नादा खेडेगावातील ६० वर्षीय रामबहोहर साहू या दमलेल्या बाबाची ही कहाणी आहे.
साहू हे पत्नी आणि मुलगा जितेंद्रसोबत मध्य प्रदेशामध्ये राहतात. मजुरीचे काम करून त्यांनी कुटुंबाचा उदनिर्वाह चालवला. पाच मुलींनंतर झालेल्या जितेंद्रच्या मोठ्या भावाचा वयाच्या १३ वर्षी पाण्यात बुडून मृत्यू झाला. पाचही मुली लग्न होऊन सासरी निघून गेल्याने वृद्धापकाळात जितेंद्रच आधार ठरणार म्हणून मजुरी करून त्यांनी मुलाचे शिक्षण पूर्ण केले. वृद्ध आई-वडिलांचा त्रास पाहून बीए पास झालेल्या जितेंद्रने परदेशात नोकरीसाठी जाण्याचे ठरवले. काकांच्या सोबतीने जितेंद्रने २६ डिसेंबर रोजी मायानगरी गाठली. मुंबई नवीन असल्याने काकाने त्याला आपल्यासोबत कंपनीत नोकरीवर ठेवले. मात्र पहिल्या दिवसाचे काम आटोपून घरी परतत असताना नाहुर स्थानकाजवळ एका कारने जितेंद्रला धडक दिली. यात डोक्यासह शरीराच्या एका बाजूला गंभीर दुखापती होऊन तो जखमी झाला. घटनास्थळी पोलीस येताच चालक स्करीया व्हई थॉमस याने त्यांच्या मदतीने जितेंद्रला उपचारांसाठी फोर्टीज रुग्णालयात दाखल केले. तेव्हा चालकाने जितेंद्रच्या सर्व वैद्यकीय खर्च उचलण्याची हमी देत रुग्णालयात आगाऊ रक्कम म्हणून ५० हजार रुपये भरले. जितेंद्रवर उपचार सुरू झाले खरे, मात्र त्याच्या अपघाताची बातमी समजताच साहू यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याच रात्री सामान बांधून त्यांनी रुग्णालय गाठले. तेथे मुलगा शुद्धीवर येत नाही,
तोच रुग्णाचे वडील आल्याचे समजताच रुग्णालयाने त्यांच्यापुढे साडेतीन लाखांचे बिल ठेवले. दिवसागणिक उपचारांच्या खर्चाचे मीटर मात्र लाखात वाढत होते. अपघातानंतर सर्व खर्च उचलण्याची ग्वाही देत त्याला खासगी रुग्णालयात दाखल करणाऱ्या कार चालकाने
त्याला गुन्ह्यातून जामीन मिळाल्याने फोन उचलणेच बंद केले आहे.
>ओळखीच्यांकडून जमा केले ८० हजार
मुलावर पुढे उपचार करायचे असतील तर बिलाची रक्कम भरण्यासाठी रुग्णालयाकडून दबाव वाढू लागल्याने अखेर, साहू यांच्यासह त्यांच्या भावाच्या नातेवाइकांनी मुंबईच्या विविध रस्त्यांवर थांबून जितेंद्रच्या उपचारांसाठी पैसे मागितले. मात्र एकही दमडी न मिळाल्याने अखेर गावातील २०० ओळखींच्या लोकांना कॉल करून मदत मागत त्यांनी ८० हजार रामबहोहर साह.ू रुपय े जमा करून त े रुग्णालयात भरल. चार दिवसांनी मिळाले जेवण दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असताना खिशात अवघे १०-२० रुपये असल्याने ते
फुटपाथवरच रात्र काढत आहेत. अखेर, सोमवारी त्यांना १० रुपयांच्या थाळीबाबत समजले. त्यांनी तेथे धाव घेत, चार दिवसांनी जेवण केले. जोपर्यंत ते मुंबईत आहे तोपर्यंत त्यांना मोफत जेवण देण्याचा मानस जगदीश शेट्टी यांनी व्यक्त केला आहे.
>आरोपी जामिनावर...
चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. सध्या ते जामिनावर आहेत. या प्रकरणी लवकरच आरोपपत्रही दाखल करण्यात येणार आहे.
- पुष्कराज सूर्यवंशी, वरिष्ठ