कहाणी आधुनिक नवदुर्गेची : बिहारची सयानी लडकी.... इंजिनीअर सयानी चॅटर्जी.... 

By सचिन लुंगसे | Published: October 1, 2022 12:28 PM2022-10-01T12:28:58+5:302022-10-01T12:35:10+5:30

शिक्षणाच्या जोरावर गाठले उच्च पद

Story of Modern Navdurga Engineer Sayani Chatterjee from bihar working tata power top post | कहाणी आधुनिक नवदुर्गेची : बिहारची सयानी लडकी.... इंजिनीअर सयानी चॅटर्जी.... 

कहाणी आधुनिक नवदुर्गेची : बिहारची सयानी लडकी.... इंजिनीअर सयानी चॅटर्जी.... 

googlenewsNext

देशातील बिमारू राज्यांपैकी एक म्हणजे बिहार या राज्याविषयी बरे बोलणारे खूपच कमी. परंतु याच बिहारला गौरवशाली आणि वैभवशाली इतिहास लाभला आहे. अशाच राज्यातील पूर्णिया या छोट्या गावातील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील धाकटी पाती असलेली मुलगी इंजिनीअर बनते आणि टाटा पॉवरसारख्या मोठ्या कंपनीत स्वतःच्या हिमतीवर मोठ्या हुड्यापर्यंत पोहोचते... सारेच स्वप्नवत... सयानी चॅटर्जी यांनी हे शब्दशः खरे करून दाखवले आहे.

सयानी यांचे कुटुंब चौकोनी वडील कालीशंकर चॅटर्जी स्टेट बँकेचे निवृत्त शाखा व्यवस्थापक तर आई रत्ना या गृहिणी, बहीण सौमी या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये (टीसीएस) काम करतात. कुटुंबातील धाकटी मुलगी म्हणून सयानी यांचे विशेष कौतुक होत असे असल्यापासूनच सयानी यांना विज्ञानाची आवड होती. मोठ्या झाल्या तशी त्यांची भौतिकशास्त्रातील आवड वाढत गेली. मुळात आवड असली तरी करिअर नेमके कशात करावे याची त्यांना कल्पना नव्हती. मात्र, त्यांनी स्वत:चा कल ओळखला आणि बारावी विज्ञान (पीसीबीएम) शाखेची निवड केली.

भुवनेश्वरच्या कलिंग इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नोलॉजी विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये बी. टेक केले. त्यानंतर त्या मुंबईत टाटा पॉवरमध्ये ग्रॅज्युएट इंजिनीअर ट्रेनी (जीईटी) म्हणून रुजु झाल्या. आज सयानी टाटा पॉवरच्या खोपोली येथील जलविद्युत प्रकल्पात प्रमुख अभियंता म्हणून काम करत असून, दिग्गज व्यक्तीप्रमाणे व्हिजनरी होण्याची त्यांची इच्छा आहे.

कुटुंबातील दुसरी व्यक्ती सयानी यांच्या कुटुंबीयांना टाटा समूहाची कार्यसंस्कृती आणि कर्मचाऱ्यांची तसेच त्यांच्या कुटुंबाची काळजी घेण्याची परंपरा माहीत आहे. कारण टाटा समूहात रुजू होणाऱ्या त्या पहिल्याच व्यक्ती नाहीत. त्यांची मोठी बहीण सौमी चॅटर्जी यादेखील टीसीएसमध्ये काम करतात.

अशी मिळाली प्रेरणा...

१. सयानी सांगतात, एका नातेवाइकाने सांगितलेल्या मुद्द्यावरून मला इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये कारकीर्द घडविण्याची प्रेरणा मिळाली.

२. तंत्रज्ञान येईल जाईल, इमारती, गाड्या, माणसे, प्राणी, पक्षी हे सारे या भूतलावर येत-जात राहील. एक गोष्ट शास्वत राहील ती म्हणजे पृथ्वी आणि पृथ्वी आहे तोवर चुंबकत्व राहील आणि तोवर वीज राहील.

३. वीज राहील तोवर इलेक्ट्रिकल इंजिनीअरची गरज भासेल, असे मला त्या नातेवाइकाने सांगितले होते.

विजेसारख्या राष्ट्र निर्माण क्षेत्रात सामील होण्याचे आवाहन...
टाटा पॉवर मध्ये काम करण्याचा अनुभव खूप समृद्ध आणि सक्षम करणारा आहे. कंपनी कायमच संपूर्ण कंपनीतील महिला कर्मचार्‍यांना तांत्रिक भूमिका घेण्यासाठी आणि आघाडीचे नेतृत्व करण्यासाठी प्रोत्साहित करत असते. मी तरुण मुली आणि महिलांना एसटीईम (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित) क्षेत्र निवडण्यासाठी आणि विजेसारख्या राष्ट्र निर्माण क्षेत्रात सामील होण्याचे आवाहन करू इच्छिते. हे तंत्रज्ञान आणि नवकल्पना देणार्‍या विचारांना शिकण्यासाठी आणि विकसित करण्याच्या अफाट संधी उपलब्ध करून देते

व्हिजनरी व्हायला आवडेल
इंजिनीअरिंग हे मोठे क्षेत्र आहे. त्यात एकच आदर्श असणे फार अवघड आहे. आपल्या सर्वांनाच निकोला टेस्ला यांच्याप्रमाणे भविष्यवेधी, जॉन मॅकार्थी यांच्याप्रमाणे कल्पक आणि कष्टाळू तर मेरी क्युरी यांच्याप्रमाणे बुद्धिमान आणि मोक्षगुंडम् विश्वेश्वरैय्या यांच्याप्रमाणे व्हिजनरी व्हायला आवडेल.
सयानी चॅटर्जी

Web Title: Story of Modern Navdurga Engineer Sayani Chatterjee from bihar working tata power top post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.