Join us

कथा अनुभवातून आकार घेते - विजया वाड

By admin | Published: September 02, 2014 12:06 AM

कथा या आभाळातून पडत नाहीत, तर त्या आपल्यातून निरनिराळ्या अनुभवांतून आकार घेतात, असे मराठी विश्वकोश मंडळाच्या अध्यक्षा, ज्येष्ठ साहित्यिका डॉ. विजया वाड यांनी रविवारी सांगितले.

कल्याण : कथा या आभाळातून पडत नाहीत, तर त्या आपल्यातून निरनिराळ्या अनुभवांतून आकार घेतात, असे मराठी विश्वकोश मंडळाच्या अध्यक्षा, ज्येष्ठ साहित्यिका डॉ. विजया वाड यांनी रविवारी सांगितले.
येथील सार्वजनिक गणोशोत्सव मंडळात सुभेदारवाडा गणोशोत्सव शताब्दी पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. शताब्दी महोत्सवानिमित्त सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रत कार्य करणा:या व्यक्तीला या पुरस्काराने दरवर्षी गौरवण्यात येते. या वर्षी कल्याणातील शैक्षणिक क्षेत्रत 5क् वर्षाहून अधिक काळ कार्य करणा:या राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त प्रतिभा भालेराव यांना हा पुरस्कार वाड यांच्या हस्ते देण्यात आला. 
15 हजार रोख, प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. व्यासपीठावर पुरस्कार समितीचे वसंतराव फडके, गोपाळ भिडे, भालचंद्र जोशी, अॅड. सुरेश पटवर्धन व रिद्धी-सिद्धी मंडळाच्या अध्यक्षा सुनीता केळकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या वेळी जोरदार पाऊस पडत असूनही प्रतिभा भालेराव यांचे आजी-माजी विद्यार्थी, गणोशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते, शैक्षणिक क्षेत्रतील व्यक्ती मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना प्रतिभा भालेराव यांनी सांगितले, समाजाची प्रगती-क्रांती ही स्वभाषेच्या किना:यावरच वृद्धिंगत होते. शिक्षणात इंग्रजी असायला हरकत नाही. ती ज्ञानाची भाषा आहे, पण त्याच वेळी शिक्षण क्षेत्रत मराठी भाषा असणो अनिवार्य आहे. त्यासाठी शिक्षक, पालक समाजाने कार्यप्रवण झाले पाहिजे. (वार्ताहर)