लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ठाण्यातील काशिमीरा परिसरात एक हरण रस्ता चुकल्याने राहत्या वसाहतीत शिरले. त्यानंतर प्राणिप्रेमी संघटना ‘सर्प इंडिया’ने त्याची सुखरूप सुटका करून त्याला पुन्हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात (नॅशनल पार्क) सोडले.
काशिमीरा येथे राहणाऱ्या यशोदा पटेकर या महिलेने १८ एप्रिल, २०२१ रोजी सर्प इंडियाला फोन करून माहिती दिली. हरण वाट चुकल्याने किंवा शिकाऱ्याच्या भीतीने त्यांच्या सोसायटीत शिरले हाेते. त्याला कुंपणाबाहेर पडता येत नसल्याने ते गोंधळले हाेते. त्याच्या डोळ्यालाही गंभीर जखम झाली हाेती. त्यामुळे अन्य सोसायटी सदस्यांच्या मदतीने पटेकर यांनी हरणाला पकडून स्वतःच्या ताब्यात घेतले. त्यानंतर सर्प इंडिया पथकाचे मितेश सोलंकी, ओमकार देहेरकर आणि अलेक्स हे वनपाल मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमी हरणावर उपचार करून त्याला नॅशनल पार्कमध्ये सोडून दिले.
...........................