भटक्या कुत्र्यांवर पालिकेकडून अंत्यसंस्कार

By सीमा महांगडे | Published: October 23, 2023 09:07 PM2023-10-23T21:07:00+5:302023-10-23T21:07:08+5:30

मालाडच्या दहन वाहिनीत आतापर्यंत १५० हून अधिक प्राण्यांवर प्रक्रिया

Stray dogs are cremated by the municipality | भटक्या कुत्र्यांवर पालिकेकडून अंत्यसंस्कार

भटक्या कुत्र्यांवर पालिकेकडून अंत्यसंस्कार

 

मुंबईपालिकेने मालाड येथे सुरू केलेल्या प्राणी दहन सुविधेत गेल्या महिन्याभरात १७१ लहान प्राण्यांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. यामध्ये भटक्या प्राण्यांसह पाळीव प्राण्यांवरही अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. यात भटक्या कुत्र्यांची संख्या सर्वांत जास्त असल्याचे समोर आले आहे.

मांजर, कुत्रे असे लहान पाळीव व भटके प्राणी आदींचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यासाठी अंत्यविधीची सुविधा मुंबई महानगरपालिकेकडून विनामूल्य आणि शास्त्रोक्त व पर्यावरणपूरक अशा पद्धतीने करून दिली आहे. यामुळे नैसर्गिक वायू आधारीत दहनाची अशी सुविधा देणारे मुंबई हे देशातील पहिले शहर ठरले असून मालाड पश्चिमेला कोंडवाडा (एव्हरशाईन नगर) येथील केटल पाँड कार्यालय येथे ५० किलो क्षमतेची पीएनजीवर आधारित ही दहन व्यवस्था असून  नैसर्गिक वायू (पीएनजी) आधारित हे दहन होणार असल्याने कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नसल्याची खबरदारी पालिका प्रशासन घेत आहे.

या दहन व्यवस्थेसाठी इंधन स्वरुपात वायू पुरवठ्याची सुविधा ही महानगर गॅस लिमिटेडच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच, लवकरच याठिकाणी लहान पाळीव प्राण्यांचे शवागार (मॉर्च्युरी) ची देखील सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, असे पशुवैद्यकीय आरोग्य खात्याचे प्रमुख डॉ. कलीमपाशा पठाण यांनी स्पष्ट लेले आहे. ही सुविधा मालाडमध्ये उपलब्ध असली तरी त्याचा उपयोग पश्चिम उपनगरासह संपूर्ण मुंबईतील प्राणिप्रेमींना त्यांच्या पाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी कहोत आहे. दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ या कालावधीत ही सुविधा विनामूल्य उपलब्ध झाल्यामुळेनागरिकांना त्याचा मोठा व सहजपणे उपयोग होत आहे.

अंत्यसंस्कार करण्यात आलेले प्राणी
पाळीव कुत्रे - १३
भटके कुत्रे - १०१
भटक्या मांजरी - ५०
पक्षी - १
कासव - १
ससा - १

या गोष्टी आवश्यक
- प्राणी दहन करण्यासाठी महानगरपालिकेचे किंवा खासगी नोंदणीकृत पशुवैद्यकीय अधिकारी यांचे मृत्यू प्रमाणपत्र आवश्यक आहे.
-नागरिकांनी ओळखीचा पुरावा म्हणून आधारकार्ड/ पॅनकार्ड/ वाहन परवाना (ड्राईव्हिंग लायसन्स)/ रेशनकार्ड यापैकी एक व पत्त्याच्या पुराव्यासाठी पारपत्र (पासपोर्ट)/ वाहन परवाना (ड्राईव्हिंग लायसन्स)/ वीज देयक/ पाणी देयक यापैकी एक घरचा पत्ता म्हणून सादर करणे आवश्यक आहे.
-प्राणिप्रेमी असतील तर भारतीय जीवजंतू मंडळाने दिलेले कोणतेही एक ओळखपत्र सादर करावे लागेल.

Web Title: Stray dogs are cremated by the municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई