Join us

स्ट्रीट क्राईम आणि महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य-  परमबीर सिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2020 7:29 PM

मुंबईचे नुतन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सांगितले.मुंबईचे ७४ वे आयुक्त म्हणून त्यांनी मावळते आयुक्त संजय बर्वे यांच्याकडून पदभार घेतला.

मुंबई : मुंबई हे देशातील सर्वात शहरापैकी एक शहर असून त्याचा हा लौकिक कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील रहाणार असून रस्त्यावरील गुन्हे(स्ट्रीट क्राईम) अटोक्यात आणणे आणि महिलांच्या सुरक्षेला आपले प्राधान्य राहणार आहे,असे मुंबईचे नुतन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सांगितले.मुंबईचे ७४ वे आयुक्त म्हणून त्यांनी मावळते आयुक्त संजय बर्वे यांच्याकडून पदभार घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले,‘अनेक कर्तृत्वान अधिकाऱ्यांनी मुंबईच्या आयुक्तपदाची धुरा सांभाळली असून ही जबाबदारी मिळणे माझ्यासाठी आभिमानास्पद आहे.

संजय बर्वे यांनी राबविलेल्या चांगल्या योजना यापुढेही कायम ठेवल्या जातील, कायदा व व्यवस्था सुरळीत ठेवण्यावर आपला भर राहणार असून महिलांसह सर्वासाठी मुंबई २४ तास सुरक्षित शहर राहिल,यासाठी आपण आपल्या सहकाऱ्यांसमवेत मिळून काम करु, मुंबईत अंडरवर्ल्ड फारसे शिल्लक राहिलेले नाही. जे काही थोडेफार असेल त्याचा बिमोड करु,’ मुंबई पोलीस दलाचे सर्व अधिकारी व अंमलदार एक परिवार म्हणून काम करेल यासाठी आपला प्रयत्न असणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आंदोलन करणे हा नागरिकांचा अधिकार

सीएए, एनआरसीच्या विरोधात दिल्लीतील शाहीन बागच्या धर्तीवर मुंबईतही बेमुदत आंदोलन सुरु आहे,त्याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले,‘ आंदोलन करणे हा नागरिकांचा अधिकार असून त्यामध्ये बाधा आणली जाणार नाही. मात्र त्याचा इतरांना त्रास न होण्याची जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे. कायद्याचे उल्लघंन करणाºयांवर निश्चितपणे कारवाई केली जाईल.’

 

टॅग्स :मुंबई पोलीसगुन्हेगारीमहिलामहाराष्ट्र