Join us

कुलाबा-सीप्झ मेट्रोसाठी एकीचे बळ!

By admin | Published: December 07, 2014 2:03 AM

मुंबईच्या भविष्याच्या दृष्टीने कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो मार्गासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन आणि बेस्ट ही तीन प्राधिकरणो एकत्र आली आहेत.

मुंबई : कोणताही प्रकल्प राबवायचा म्हटल्यास महापालिका, बेस्ट, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण सहसा एकत्र येत नाहीत. परंतु मुंबईच्या भविष्याच्या दृष्टीने कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो मार्गासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन आणि बेस्ट ही तीन प्राधिकरणो एकत्र आली आहेत.
राज्य सरकारने कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मार्गाचे काम मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमार्फत हाती घेतले आहे आणि या मार्गासाठी एमएमआरडीए, एमएमआरसी, बेस्ट ही तीन प्राधिकरणो एकत्र आली आहेत. या कामाचा प्रस्ताव बेस्ट समितीत आला आहे. लवकरच या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. कुलाबा-सीप्झ भुयारी मेट्रो मार्गाचे काम जानेवारी 2क्15 मध्ये सुरू होणार आहे. जपान आंतरराष्ट्रीय सहकार संस्था, केंद्र सरकार आणि प्राधिकरणाच्या अर्थसाहाय्याने हा प्रकल्प उभारला जाणार आहे. 23 हजार 136 कोटींच्या या प्रकल्पाला जायका 57 टक्के कर्ज देणार आहे; तर उर्वरित रक्कम भारत सरकार आणि प्राधिकरणाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन उभी करणार आहे. यात केंद्र सरकार उपकर्जाच्या माध्यमातून 5क् टक्के रक्कम आणि प्राधिकरणाच्या माध्यमातून 5क् टक्के रक्कम शासन उभारणार आहे. दरम्यान, बेस्टच्या सार्वजनिक परिवहन सेवेत बदल करणो, बेस्टने मेट्रोला पूरक सेवा देणो, प्रवाशांना एकाच ठिकाणी मेट्रो स्थानक, बसस्थानक आणि वाहनतळ इत्यादी सुविधा मिळाव्यात, म्हणून ही प्राधिकरणो एकत्रित आली आहेत.
कुलाबा-सीप्झ भुयारी मार्गावर कफ परेड, विधान भवन, चर्चगेट, हुतात्मा चौक, सीएसटी मेट्रो, काळबादेवी, गिरगाव, ग्रँट रोड, मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी मेट्रो, सायन म्युङिायम, आचार्य अत्रे चौक, वरळी, सिद्धिविनायक, दादर, धारावी, बीकेसी मेट्रो, विद्यानगरी, सांताक्रूझ, सहार रोड,  सीप्झ या स्थानकांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)