मुंबई- गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे, कालपासून बीड आणि धाराशीव जिल्ह्यात जाळपोळ सुरू झाली आहे. काल बीडमध्ये आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्याजवळ असणाऱ्या वाहणांना आग लावण्यात आली, तर आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घराजवळ असणारे ऑफिस पेटवले. यावर आता आमदार बच्चू कडू यांनी मराठा आंदोलकांना आवाहन केले आहे.
बीडमध्ये १ नोव्हेंबरपर्यंत इंटरनेट बंद; रात्री ७२ बसेस फोडल्या, मराठा आंदोलनाची लेटेस्ट अपडेट
आमदार बच्चू कडू म्हणाले, हे आंदालन शांततेत व्हावे, शांततेच्या आंदोलनातच बळ आहे. मी मुख्यमंत्र्यांशीही या बाबतीत चर्चा केली आहे. वेळ लागेल पण आरक्षण मिळणार आहे, शांतेतेत आंदोलन व्हावे. आंदोलनाची सरकारने गंभीर दखल घ्यावी म्हणून आम्ही ६ नोव्हेंबरला जिजाऊंच्या जन्मस्थळी जाऊन रक्तदान करुन शांततेत आंदोलन करणार आहोत. मनोज जरांगे पाटील यांनीही पाणी प्यावे, कोणाचीही घरं जाळणं हे चुकीचं आहे, शांततेत आंदोलन करावे, असं आवाहन आमदार बच्चू कडू यांनी केलं.
आज महाराष्ट्र बंद? सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर स्टेटस
काल दिवसभरात जाळपोळीचे प्रकार घडल्यानंतर आज मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आल्याचे व्हॉट्सअप स्टेटस आणि सोशल साईट्सवर पोस्ट मोठ्या प्रमाणावर टाकण्यात येत आहेत. हे सर्व मराठा आंदोलक करत असले तरी अशाप्रकारे कोणताही बंद आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटलांकडून पुकारण्यात आलेला नसल्याचा खुलासा मराठा समाजाकडून करण्यात आला आहे.
महाराष्ट्र बंद बाबत व्हायरल होत असणाऱ्या मेसेजवर मराठा समाजाने भूमिका मांडली आहे. महाराष्ट्र बंदचा कोणताही मेसेज जरांगे पाटलांकडून आलेला नाही. यामुळे सर्व आहे तसे सुरु राहणार असल्याचे ठाण्याताल मराठा समाजाने सांगितले आहे.