मुंबई : सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यासाठी पश्चिम रेल्वे मार्गावरील स्थानकावर २ हजार ८१५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास मंजुरी मिळाली आहे. चर्चगेट ते विरार स्थानकापर्यंत २ हजार ७२९ कॅमेरे लावले जाणार आहेत, तर सुरत येथे ८६ सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. आॅगस्ट, २०१९ पर्यंत २ हजार ८१५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.पश्चिम रेल्वे मार्गावरील सर्वाधिक गर्दीची स्थानक म्हणून चर्चगेट, मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे टर्मिनस, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, कांदिवली, बोरीवली, दहिसर, वसई रोड या स्थानकांची ओळख आहे. त्यामुळे या रेल्वे स्थानकांवर सर्वाधिक सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत.पश्चिम रेल्वे स्थानकावर गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी, गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी सीसीटीव्हीचा वापर केला जातो. यासह गर्दीमधील चोर, महिलांची छेडछाड करणाऱ्या टोळी यांच्यावर सीसीटीव्हीची करडी नजर असते. त्यामुळे सीसीटीव्ही लावणे फायदेशीर असणार आहे. या वर्षीच्या आॅगस्ट अखेरपर्यंत २ हजार ८१५ सीसीटीव्ही कॅमेºयांची भर पडणार आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील ३ हजार ९४३ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत.पश्चिम रेल्वे मार्गावरील एकात्मिक सुरक्षेसाठी २० कोटी रुपयांचा निधी यंदाच्या अर्थसंकल्पात मांडण्यात आला आहे. याद्वारे गर्दीच्या ठिकाणी, पादचारी पूल, तिकिटघर, सरकते जिने या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.स्थानक आताची बसविण्यातसंख्या येणारेसीसीटीव्हीचर्चगेट ६४ १५७मरिन डाइव्ह १६ ३२चर्नी रोड १६ ३७ग्रांट रोड १६ ३९मुंबई सेंट्रल ९६ ३१५महालक्ष्मी १६ २३लोअर परळ १६ १६प्रभादेवी १६ ३२दादर ६४ ९६माटुंगा रोड १६ ३२माहिम १६ ४७वांद्रे ४८ ६२वांद्रे टर्मिनस ५९ १७०खार रोड १६ १८सांताक्रुझ १६ २२विलेपार्ले १६ १९अंधेरी ४८ १९३जोगेश्वरी १२ १३६राम मंदिर ४४ ६८गोरेगाव ४० १३७
सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यासाठी पश्चिम रेल्वे मार्गावर २ हजार ८१५ सीसीटीव्ही
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 12:36 AM