कोरोना लढ्याचे बळकटीकरण; मुंबई महापालिका आणि प्रोजेक्ट स्टेप वन यांचा संयुक्त कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 07:07 AM2021-04-19T07:07:56+5:302021-04-19T07:09:02+5:30
गृह विलगीकरण पाठपुरावा हा मुंबई महापालिका आणि प्रोजेक्ट स्टेप वन यांचा संयुक्त कार्यक्रम आहे. त्यानुसार, मुंबई महापालिकेने विभाग नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक जारी केले आहेत. रोगाची लक्षणे वाढू लागल्यास, जर रुग्णवाहिका/बेडची आवश्यकता असल्यास विभागाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधता येईल.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत असतानाच यावर मुंबई महापालिका वेगवेगळ्या स्तरातून उपाययोजना करीत आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबई महापालिकेने आता गृह विलगीकरण मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. याद्वारे कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी मुंबईकरांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने नागरिकांना केले आहे.
गृह विलगीकरण पाठपुरावा हा मुंबई महापालिका आणि प्रोजेक्ट स्टेप वन यांचा संयुक्त कार्यक्रम आहे. त्यानुसार, मुंबई महापालिकेने विभाग नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक जारी केले आहेत. रोगाची लक्षणे वाढू लागल्यास, जर रुग्णवाहिका/बेडची आवश्यकता असल्यास विभागाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधता येईल.
आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करून तो सक्रिय स्थितीत ठेवण्यात यावा. हे शारीरिक विलगीकरण आहे. मानसिक विलगीकरण नाही. त्यामुळे परिवारातील सदस्य, मित्र, नातेवाईक यांच्याशी फोन, व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क ठेवा. टीव्ही बघा. पुस्तके वाचा. कोविडमुळे तणावमुक्त, उदास, एकटे वाटत असल्यास मानसिक स्वास्थ्यासाठी पालिकेच्या प्रशिक्षित सल्लागाराशी संपर्क साधा. कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्वरित चाचणी करून घ्या. आजारी व्यक्ती, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घ्या, असे आवाहन मुंबई महापालिकेने याद्वारे केले आहे.
दरम्यान, कोरोना संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर शासन राबवीत असलेल्या विविध उपाययोजनांसह यासंदर्भातील निर्णय, योजना, उपक्रम आणि आकडेवारीची माहिती जनतेला आता एकाच ठिकाणी मिळणार आहे. यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंवाद वेबपोर्टलवर ‘लढा कोरोनाशी’ हे सदर कार्यान्वित करण्यात आले आहे.
गृह विलगीकरणाचा पाठपुरावा हाच मुख्य हेतू
गृह विलगीकरण पाठपुरावा हा मुंबई महापालिका आणि प्रोजेक्ट स्टेप वन यांचा संयुक्त कार्यक्रम आहे. त्यानुसार, मुंबई महापालिकेने विभाग नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक जारी केले आहेत. रोगाची लक्षणे वाढू लागल्यास, जर रुग्णवाहिका/बेडची आवश्यकता असल्यास विभागाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधता येईल.
सुरुवातीचे इशारे
n श्वास घेताना त्रास होणे
n ऑक्सिजनची पातळी ९५ टक्क्यांपेक्षा खाली येणे
n शरीराचे तापमान दीर्घकाळ १०० फॅरनहिटपेक्षा जास्त असणे
n छातीत दुखणे आणि
दीर्घकाळ खोकला होणे
n मानसिक संभ्रम व झोप येणे
काय कराल?
n रक्तदाब/रक्तातील साखरेचे प्रमाण तपासत राहा
n शरीराचे तापमान मोजा
n इतर लक्षणांची नोंद ठेवा
n आरोग्य बिघडल्यास
विभागीय नियंत्रण कक्षा
इतर लक्षणे
घसा खवखवणे
n थकवा, अंगदुखी, सर्दी
n चव घेण्याची व वास
घेण्याची क्षमता नाहीशी होणे
n डोके दुखणे
हे करा !
n घरातील वारंवार स्पर्श होत असलेल्या पृष्ठभागांना दिवसातून एक ते दोन वेळा स्वच्छ करा
n मास्कचा वापर करा
n वारंवार हात धुवा
n विश्रांती, आहार,
पोषण आणि व्यायाम
n भरपूर पाणी प्या
n कोमट मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करा
n सिगारेट/मद्यपान टाळा
n उलटी होणे
n पोट बिघडणेला फोन करा