आरोग्य यंत्रणेवर ताण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:07 AM2021-04-01T04:07:19+5:302021-04-01T04:07:19+5:30
३ हजार ९३३ खाटा उपलब्ध आरोग्य यंत्रणेवर ताण! मुंबईत १६ हजारांपैकी १२ हजार खाटा भरल्या लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई ...
३ हजार ९३३ खाटा उपलब्ध
आरोग्य यंत्रणेवर ताण!
मुंबईत १६ हजारांपैकी १२ हजार खाटा भरल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने यंत्रणेवरील ताणही वाढतो आहे. मुंबईत रुग्णालये, जम्बो कोरोना केंद्रांत कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या १६ हजार ५६१ खाटांपैकी १२ हजार ६२८ खाटांवर रुग्ण आहेत. तर केवळ ३ हजार ९३३ खाटा उपलब्ध असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
मुंबईत रुग्णालय व कोविड केंद्रांतील अतिदक्षता विभागात १ हजार ६२७ अतिदक्षता खाटा उपलब्ध असून, १ हजार ३०३ खाटा आरक्षित आहेत. ३२४ खाटा उपलब्ध आहेत. ऑक्सिजन खाटा ८ हजार ९१४ असून, त्यातील ६ हजार ६९५ खाटा आरक्षित आहेत. २ हजार २१९ खाटा रिक्त आहेत. व्हेंटिलेटर सेवा उपलब्ध असलेल्या एकूण हजार खाटा असून त्यातील ८३० खाटा आरक्षित आहेत. तर १७० खाटा रिक्त आहेत.
* कोविड काळजी केंद्र - टाईप १
एकूण खाटा ४० हजार ४२०
आरक्षित खाटा ९८८
कोविड काळजी केंद्र - टाईप २
एकूण खाटा - २३ हजार ८०६
आरक्षित खाटा - २५६७