Join us

दरवाजा अडविणाऱ्या टग्यांवर कठोर कारवाई

By admin | Published: December 04, 2015 2:38 AM

भावेश नकाते या प्रवाशाचा मृत्यू लोकलमधून पडून झाल्यानंतर डब्यातील दरवाजा अडवून प्रवाशांना प्रवेश नाकारणाऱ्या आणि अरेरावी करणाऱ्या गटांवरही कारवाई करण्याची मागणी

मुंबई : भावेश नकाते या प्रवाशाचा मृत्यू लोकलमधून पडून झाल्यानंतर डब्यातील दरवाजा अडवून प्रवाशांना प्रवेश नाकारणाऱ्या आणि अरेरावी करणाऱ्या गटांवरही कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर अशा प्रवासी गटांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतल्याचे मध्य रेल्वे सुरक्षा दलाचे पोलीस महानिरीक्षक ए.के. सिंग यांनी सांगितलेलोकलच्या दरवाजाजवळ उभे राहून गटबाजी करणारे प्रवासी बरेच निदर्शनास येतात. गर्दीच्या वेळी अशा गटबाजी करणाऱ्या प्रवाशांकडून अन्य प्रवाशांना प्रवेश नाकारला जातो आणि त्यामुळे लोकलमध्ये चढण्यास प्रवाशांना अडचण निर्माण होते. डोंबिवलीवर भावेश नकाते याचा झालेला मृत्यू हा याच कारणांमुळे तर नाही ना, असा सवालही उपस्थित होत आहे. त्यामुळे अडेल प्रवाशांवर कारवाईची मागणी केली जात आहे. याबाबत रेल्वे सुरक्षा दलाचे (आरपीएफ) महानिरीक्षक ए.के. सिंग यांनी सांगितले की, आरपीएफकडून अशा स्थानकांची तसेच लोकलची माहिती घेतली जात असून कठोर कारवाई केली जात आहे. डोंबिवली, कल्याण, बदलापूरसह काही स्थानकांतून गटबाजी करणारे प्रवासी चढतात आणि लोकलमध्ये दादागिरी करतात. त्यांच्यावर कारवाई केली जात असली तरी आता ही कारवाई अधिक कठोर केली जाणार असल्याचे ते म्हणाले. प्रवाशांना त्रास होत असल्यास त्यांनी पुढाकार घेऊन आरपीएफकडे तक्रार नोंदवण्याचे आवाहनही त्यांनी केले.महिलांच्या सुरक्षेबाबत जनजागृतीअक्षरा संस्थेकडून मध्य रेल्वे प्रशासन व आरपीएफच्या सहकार्याने महिला प्रवाशांच्या सुरक्षेबाबत जनजागृती मोहीम आखली आहे. त्याचा शुभारंभ गुरुवारी सीएसटी स्थानकात करण्यात आला.या मोहिमेचे उद्घाटन आरपीएफचे महानिरीक्षक ए.के. सिंग यांच्या हस्ते करण्यात आले. या मोहिमेअंतर्गत छेडछाड, लैंगिक शोषणाविरोधात प्रवाशांना आवाज उठविण्याचे आवाहन केले जाणार आहे.डोंबिवली, कल्याण, बदलापूरसह काही स्थानकांतून गटबाजी करणारे प्रवासी चढतात आणि लोकलमध्ये दादागिरी करतात. त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.चौकशी समितीत ट्रॅव्हल एजंटभावेश नकातेच्या मृत्यूनंतर मुंबई उपनगरीय मार्गावर होणाऱ्या अपघातांचा आढावा घेण्यासाठी रेल्वेमंत्र्यांकडून चौकशी समिती नेमण्यात आली आहे. या समितीकडून ३१ डिसेंबरपर्यंत अहवाल तयार करून त्याद्वारे सूचना केल्या जाणार आहेत.मात्र मध्य रेल्वेकडून स्थापन करण्यात आलेल्या समितीत एका एनजीओचे प्रतिनिधी म्हणून एल.आर. नागवानी यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवासी संघटनांसह प्रसारमाध्यमांनाही त्यांच्या समावेशामुळे आश्चर्य वाटले आहे. ते हॅरिसन ट्रॅव्हलचे मालक व रेल्वे प्रवासी तिकीट सेवा केंद्राचे पहिले कंत्राटधारक असल्याचे सूत्रांनी सांगितले.