मुंबई : दादरमध्ये आज नेहमीपेक्षा गर्दी कमी होती. लोक काही प्रमाणात याला चांगला प्रतिसाद देत आहेत तर काही लोक मात्र अजूनही लोकल परिसरात तसेच फुलमार्केट परिसरात गर्दी करत आहेत. कोरोना हॉटस्पॉटच्या परिसरात मात्र कडक निर्बंध लादले गेले आहेत. गर्दीच्या ठिकाणी पोलीस मात्र जागोजागी तैनात आहेत. लोकल परिसरात तसेच दादरमध्ये फुलमार्केट परिसरात गर्दी होऊ नये म्हणून काळजी घेतली जात आहे. अनेक रस्त्यावरील धंदे बंद असल्याकारणामुळे मात्र व्यावसायिकांना याचा फटका बसल्याचे दिसून येत आहे.
व्यावसायिक निर्मल मोरे म्हणाले की, सरकारने परत एकदा निर्बंध लादल्यामुळे आम्हाला धंद्यामध्ये तोटा सहन करावा लागत आहे. सरकारने पोटापाण्याची सोय करावी आणि मग काय असेल तर लॉकडाऊन लावावे. बहुतेककरून दादर परिसरामध्ये मद्याच्या दुकानावर रांगा लागलेल्या दिसून आल्या. यानंतर मात्र फुलमार्केट परिसरामध्ये मात्र सकाळी गर्दी होती. मात्र पोलिसांनी काही काळानंतर गर्दी आटोक्यात आणली. रस्त्यावर बरीच दुकाने बंद असल्याकारणामुळे रस्त्यावर गर्दी कमी होती. मात्र लोक अजूनही कोरोनाच्या बाबतीत गंभीर दिसून येत नाहीत, असे चित्र आहे. लोकलच्या वेळ जरी निश्चित केल्या असल्या तरी आज लोकलमध्ये काही प्रमाणात गर्दी होती. अत्यावश्यक आणि जीवनावश्यक वस्तूंची दुकाने चालू होती. थोड्याबहुत प्रमाणांत दुकानांवरदेखील गर्दी आढळून येत होती. खाण्याच्या हॉटेल्समध्ये पार्सलची सुविधा उपलब्ध होती.