वीज कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन; आज ऊर्जा सचिवांच्या पातळीवर बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:06 AM2021-05-31T04:06:42+5:302021-05-31T04:06:42+5:30
मुंबई : वीज कामगार, अभियंते, अधिकारी, कंत्राटी आणि आऊट सोर्सिंग कामगार यांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा द्यावा, या प्रमुख मागणीसह ...
मुंबई : वीज कामगार, अभियंते, अधिकारी, कंत्राटी आणि आऊट सोर्सिंग कामगार यांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा द्यावा, या प्रमुख मागणीसह उर्वरित मागण्यांसाठी पुकारण्यात आलेले आंदोलन अद्याप सुरुच असून, सोमवारी ऊर्जा सचिवांच्या पातळीवर बैठक होणार आहे. या बैठकीत तोडगा निघेल, अशी शक्यता आहे. त्यामुळे आंदोलनकर्त्यांचे डोळे या बैठकीकडे लागून राहिले आहेत.
ऊर्जा क्षेत्रातील तिन्ही कंपनीत कार्यरत असणाऱ्या प्रमुख सहा संघटनांच्या कृती समितीतर्फे राज्यभरात कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. कोरोना महामारीच्या काळात मेडी असिस्ट नविन टीपीएची नेमणूक केल्यामुळे प्रचंड असतोष वीज कामगार, अभियंते, अधिकारी यांच्यात निर्माण झाला आहे. म्हणूनच हे कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय वीज कर्मचारी, अभियंते संघटना, संयुक्त कृती समितीमध्ये सहभागी सहा संघटनांनी घेतला आहे.