Join us

स्ट्राइक रेट अन् जिंकण्याची क्षमता हाच निकष; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितला फॉर्म्युला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 5:34 AM

निवडणूक नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये जागावाटप लोकसभेतील स्ट्राइक रेट आणि निवडून येण्याची क्षमता या निकषावर होईल, असे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. विधानसभेची निवडणूक नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात आणि दोन टप्प्यांमध्ये होईल अशी अपेक्षा असल्याचेही ते म्हणाले.

अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

ते वर्षा निवासस्थानी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करत होते. निवडून येण्याची क्षमता हाच जागावाटपाचा मुख्य आधार असेल असे भाजपचे नेते सांगत असतानाच आता मुख्यमंत्र्यांनी त्यात ‘स्ट्राइक रेट’ची भर टाकली आहे. लोकसभा निवडणुकीत

शिंदे सेनेचा स्ट्राइक रेट चांगला होता. त्यांनी १५ जागा लढवल्या आणि ७ जिंकल्या होत्या.

राज्य सरकारने घोषित केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि अन्य योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर भार येईल, राज्य आर्थिक संकटात सापडेल हा विरोधकांचा खोडसाळ प्रचार आहे. आमच्या योजनांना नावे ठेवणारे विरोधक खटाखट पैसे कुठून आणणार होते, असा सवाल देखील मुख्यमंत्र्यांनी  यावेळी उपस्थित केला.

जागावाटपाचे सूत्र लवकरच

nलोकसभा निवडणुकीत स्ट्राइक रेट चांगला असलेल्या

पक्षाला अधिक जागा मिळाव्यात किंवा मिळतील अशी शक्यता आहे. जिंकून येण्याची क्षमता हा निकष सुद्धा आम्ही विचारात घेत आहोत.

महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला लवकरच ठरेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. निवडणूक नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे, मात्र अंतिम निर्णय आयोगाचा असेल असे ते म्हणाले.

सर्वेक्षणाचा आधार घेणार

विधानसभेला उमेदवार निवडताना महायुतीतील तिन्ही पक्षांच्या सर्वेक्षणाचा विचार करून जागा व उमेदवारी दिली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत भाजपच्या सर्वेक्षणाच्या आधारे जागावाटप आणि उमेदवार ठरविल्याने फटका बसल्याची चर्चा होती.

टॅग्स :एकनाथ शिंदेशिवसेना