तरुणांना रोजगार देण्यासाठी प्रयत्नशील

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 02:16 AM2020-01-09T02:16:12+5:302020-01-09T02:23:32+5:30

समाजातील लोकांसाठी अद्याप वैद्यकीय तसेच शैक्षणिक मदत संघाकडून करण्यात आली आहे.

strives to provide employment to the youth | तरुणांना रोजगार देण्यासाठी प्रयत्नशील

तरुणांना रोजगार देण्यासाठी प्रयत्नशील

Next

गौरी टेंबकर-कलगुटकर 
मुंबई : ‘समाजातील लोकांसाठी अद्याप वैद्यकीय तसेच शैक्षणिक मदत संघाकडून करण्यात आली आहे. यापुढे सुशिक्षित भंडारी तरुणांना रोजगार मिळवून देण्याच्या दृष्टीनेही संघाकडून प्रयत्न केले जाणार असल्याचे माजी पोलीस अधिकारी तसेच कारवार जिल्हा भंडारी संघ मुंबईचे अध्यक्ष नागेश रायकर यांनी रविवारी स्नेहसंमेलनादरम्यान सांगितले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भंडारी बांधव उपस्थित होते.
प्रभादेवीतील रवींद्र नाट्य मंदिरात कारवार जिल्हा भंडारी संघ, मुंबई यांचे ७४ वे स्नेहसंमेलन दिमाखात साजरे करण्यात आले. या कार्यक्रमात भारतीय हवाईदलाचे निवृत्त अधिकारी उदय कलगुटकर, कारवार म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या नगरसेविका सुजाता तामसे तसेच सुहानी पाटील या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. कारवार समाजाचे नेते के. डी. पेडणेकर यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमाला संबोधित करीत असताना रायकर म्हणाले, ‘गेल्या अनेक वर्षांपासून संघाकडून गरजू भंडारी बांधवाना वैद्यकीय तसेच शैक्षणिक मदत पुरविण्यात येत आहे. मात्र आता एक पाऊल पुढे जात भंडारी तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठीही संघ आणि त्याचे पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत. जेणेकरून युवा पिढीला योग्य मार्गदर्शन मिळून त्यांच्या जीवनशैलीत सुधारणा करता येईल. समाजाला बळकट करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहनही रायकर यांनी या वेळी केले. या कार्यक्रमात भंडारी बांधवांनी गीत आणि नृत्य सादर करीत उपस्थितांचे मनोरंजन केले.
शैक्षणिक तसेच स्पर्धा परीक्षेत यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांचाही या वेळी गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा मनीषा पत्रेकर आणि नीता मांजरेकर यांनी सांभाळली. तर धमाल विनोदी नाटक ‘गलती से मिस्टेक’ या हास्यमेजवानीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
>अथर्व अंकोलेकरच्या आईंचा सत्कार
कारवारच्या कोडीबागचा मूळ रहिवासी तसेच १९ वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झालेला अष्टपैलू अथर्व अंकोलेकर याची आई वैदेही यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. पतीच्या निधनानंतर ‘बेस्ट’मध्ये वाहक म्हणून कार्यरत असलेल्या वैदेही यांनी फावल्या वेळात शिकवण्या घेऊन मुलांच्या ध्येयपूर्तीसाठी पाठिंबा दिला.
>संघाच्या ‘लोगो’चे अनावरण : सागर पत्रेकर या तरुणाच्या कल्पकतेतून कारवारची जीवनशैली तसेच निसर्गसौंदर्याचे दर्शन घडविणाºया संघाच्या लोगोचे अनावरण या वेळी करण्यात आले. तर नव्याने अपडेट करण्यात आलेल्या भंडारी समाजाच्या वेबसाईटची माहिती सहकार्यवाहक दिनेश तामसे यांनी दिली.

Web Title: strives to provide employment to the youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.