सोशल मीडियाची जोरदार हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:07 AM2020-12-22T04:07:05+5:302020-12-22T04:07:05+5:30

सोशल मीडियाची जोरदार हवा... यंदाच्या वर्षात कोरोनाच्या महामारीमुळे अवघे विश्व एका क्लिकवरून हँडल करावे लागले. एखादी व्यक्ती कार्यालयात पोहोचूनच ...

Strong air of social media | सोशल मीडियाची जोरदार हवा

सोशल मीडियाची जोरदार हवा

Next

सोशल मीडियाची जोरदार हवा...

यंदाच्या वर्षात कोरोनाच्या महामारीमुळे अवघे विश्व एका क्लिकवरून हँडल करावे लागले. एखादी व्यक्ती कार्यालयात पोहोचूनच काम करू शकते, ही विचारधारणा पुसून अगदी सगळीच काम मोबाइल, लॅपटापच्या स्क्रीनवरून अगदी सहज सोप्या पद्धतीने करता येऊ लागले. अगदी गल्ली-गाव ते आंतरराष्ट्रीय पातळीवरील टॅलेंटला व्यासपीठ दिलेल्या टिकटॉक हे ॲप अचानक बंद झाले अन् जणू तरुणाईला हळहळ वाटली. या ॲपची कसर भरून काढण्यासाठी काही दिवसांमध्ये इन्स्टाग्रामने रिल्सचा पर्याय आणला, तर युट्यूबनेही शाॅट्स सुरू करून तरुणपिढीला आपल्याकडे वळण्यास भाग पाडले. यंदाच्या वर्षात युट्यूबचे मार्केटही दुप्पट गतीने विस्तारले. शिवाय, ट्विटरनेही काळाच्या गतीनुसार आपले रूपडे बदलल्याने युझर्सची मने जिंकली. इन्स्टा, युट्यूबमुळे पूर्वी काही घटकांपुरते मर्यादित असणारे इन्फ्लुएन्सर, क्रिएटर या करिअरच्या विश्वाने अनेकांसाठी दालन खुले केले आहे. ट्विटर आणि फेसबुकवरील पोस्टने राजकारणी, पोलीस आणि न्यायालये यांची डोकेदुखी बऱ्यापैकी वाढविली.

ट्विटरवर गाजलेले

सर्वाधिक रिट्विट - दक्षिणेतील सुपरस्टार थलपती विजय याने चाहत्यांसह काढलेला सेल्फी

सर्वाधिक लाइक्स – अनुष्का शर्मा गर्भवती असल्याचे विराट कोहलीने केलेले ट्विट

सर्वाधिक चर्चेतले विषय – कोविड १९ , सुशांतसिंग राजपूत आणि हाथरस

क्रीडा क्षेत्रात ‘आयपीएल २०२०’ तर बॉलीवूडमध्ये ‘दिलबेचारा’ हे हॅशटॅग सर्वाधिक चर्चेत होते.

सर्वाधिक ट्विट झालेले मिम – बिंदू

(स्रोत - ट्विटर).

.....

टॉप टेन गुगल सर्च की वर्ड्स

युट्यूब

व्हॉट्सॲप वेब

जीमेल

गुगल

फेसबुक

एफबी

ॲमेझॉन

फ्लिपकार्ट

क्रीकबझ

हॉटस्टार

(स्रोत - टेकसीन)

......

Web Title: Strong air of social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.