Join us

स्त्री-पुरुष समानतेवर ठाम विश्वास; भारतातील स्त्री सक्षमीकरणाचं चित्र आनंददायी - सोहा अली खान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2023 5:37 PM

अभिनेत्री आणि लेखिका सोहा अली खानने देखील मनमोकळेपणाने संवाद साधला.

आंतरराष्ट्रीय महिला दिन साजऱ्या करणाऱ्या महिन्याची सुरुवात एअरबीएनबीने एका पॅनल चर्चेच्या आयोजनाने केली. या पॅनलवर अभिनेत्री व लेखिका सोहा अली खान, गायिका व गीतकार लिसा मिश्रा, स्त्री उद्योजक कीर्ती पूनिया (सहसंस्थापक, रिलव्ह) आणि एअरबीएनबीच्या होस्ट काकोली यांचा समावेश होता. ‘एम्ब्रास इक्विटी’ या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या यंदाच्या विषयावर या सर्वांनी आपले विचार मांडले. 

अभिनेत्री आणि लेखिका सोहा अली खानने देखील मनमोकळेपणाने संवाद साधला. स्त्री-पुरुष समानतेवर ठाम विश्वास असून भारतातील स्त्री सक्षमीकरणाचं चित्र आनंददायी असल्याचं तिने म्हटलं आहे. "स्त्रियांच्या सक्षमीकरणाबाबत जे स्थित्यंतर, विशेषत: भारतात, दिसून येत आहे, त्यामुळे मला अत्यानंद होत आहे. मात्र, आपल्याला अद्याप मोठा पल्ला गाठायचा आहे असेही मला वाटते. यंदाच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा विषय मला खूपच आपलासा वाटतो, कारण, माझा लिंगसमानतेवर ठाम विश्वास आहे आणि मी या संकल्पनेचा प्रसारही करते."

"हॉस्पिटॅलिटी उद्योगात समानतेचा स्वीकार करण्यासाठी तसेच स्त्रियांना खऱ्या अर्थाने आनंद देणारे काम करण्याची संधी देण्यासाठी मदत करण्याचा एअरबीएनबीचा प्रयत्न नक्कीच प्रशंसनीय आहे. यामुळे आपण एका स्वयंपूर्ण भवितव्याकडे वाटचाल करत आहोत" असं सोहा अली खानने म्हटलं आहे.  एअरबीएनबीच्या भारतातील व जगभरातील समुदायात स्त्रियांचा वाटा मोठा आहे. एअरबीएनबीच्या जागतिक होस्ट समुदायात निम्म्याहून अधिक स्त्रिया आहेत. हे होस्ट्स स्थानिक समुदायांनाही आधार देण्याचे काम करतात. या स्त्रिया अन्य स्त्रियांना रोजगार पुरवतात. 

एअरबीएनबी स्त्री होस्ट्सनी भारतात २०२२ सालात एकत्रितरित्या १ अब्ज रुपयांहून अधिक उत्पन्न कमावले आहे, असे एअरबीएनबीच्या आकडेवारीतून दिसून येते. याशिवाय, एअरबीएनबीवरील ६० वर्षांहून अधिक वयाच्या स्त्री होस्ट्सनीही भारतात २०२२ सालात २० कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न कमावले आहे. यांच्यापैकी अनेकींना या कामामुळे निवृत्तीनंतर आवश्यक असलेले उत्पन्न प्राप्त होत आहे. एअरबीएनबीची सुरुवात २००७ मध्ये झाली. सॅनफ्रान्सिस्को येथील एका घरात दोन होस्ट्सनी तीन पाहुण्यांचे स्वागत केले आणि एअरबीएनबीची सुरुवात झाली. आता या प्लॅटफॉर्मवर ४ दशलक्ष होस्ट्स आहेत.  

टॅग्स :सोहा अली खान