सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकपदासाठी जोरदार स्पर्धा

By Admin | Published: March 17, 2016 01:10 AM2016-03-17T01:10:46+5:302016-03-17T01:10:46+5:30

सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांची बॉम्बे पोर्ट ट्रस्टच्या चेअरमनपदी बदली झाली आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या सिडकोच्या या पदासाठी वरिष्ठ

Strong competition for the post of Managing Director of CIDCO | सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकपदासाठी जोरदार स्पर्धा

सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकपदासाठी जोरदार स्पर्धा

googlenewsNext

- कमलाकर कांबळे,  नवी मुंबई
सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांची बॉम्बे पोर्ट ट्रस्टच्या चेअरमनपदी बदली झाली आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या सिडकोच्या या पदासाठी वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांत जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. यात एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते.
सिडको हे राज्य शासनाचे सर्वात श्रीमंत महामंडळ म्हणून ओळखले जाते. सध्या सिडकोच्या माध्यमातून प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो प्रकल्प, ३६ हजार कोटींचा स्मार्ट सिटी प्रकल्प, ६00 चौरस किमीचा नैना प्रकल्प, जेएनपीटी प्रभावित क्षेत्र आदी महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. त्यामुळे सिडकोचे महत्त्व आणखीच वाढले आहे. या पार्श्वभूमीवर या महामंडळावर नियुक्ती व्हावी, यासाठी वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांत जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे समजते. दोन महिन्यांपासून भाटिया यांच्या बदलीचे वारे वाहत होते. अखेर मंगळवारी त्यांच्या बदलीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. केंद्र शासनाने भाटिया यांना प्रतिनियुक्तीवर घेतले असून त्यांची वर्णी बॉम्बे पोर्ट ट्रस्टच्या चेअरमनपदी करण्यात आली आहे. त्यामुळे सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकपदावर डोळा ठेवून असणाऱ्या वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांनी आपली फिल्डिंग सुरू केली आहेत. या पदासाठी इच्छुक असणाऱ्यांत भूषण गगराणी यांच्यासह मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण परदेशी, एसआरए प्रकल्पाचे असिम गुप्ता यांचा समावेश आहे. तसेच सिडकोच्या कामाचा पूर्व अनुभव असणारे अन्न आणि पुरवठा विभागाचे सध्याचे सचिव दीपक कपूर यांच्याही नावाची चर्चा आहे.
असे असले तरी यात गगराणी यांचेच नाव आघाडीवर आहे.
भाटिया यांची बीपीटीच्या चेअरमनपदी नियुक्ती झाली असली तरी राज्य शासनाने अद्यापि त्यांच्या बदलीचे आदेश काढलेले नाहीत. मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली जाणार आहे. या बैठकीत संजय भाटिया विमानतळाचे सादरीकरण करणार आहेत. त्यानंतर भाटिया हे आपल्या पदाचा कार्यभार सह व्यवस्थापकीय संचालिका व्ही.राधा यांच्याकडे सुपूर्द करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे नवीन व्यवस्थापकीय संचालकाची नियुक्ती होईपर्यंत या पदाचा अतिरिक्त पदभार राधा यांच्याकडे असणार आहे.

यांच्या नावाची चर्चा
- या पदासाठी इच्छुक असणाऱ्यांत भूषण गगराणी यांच्यासह मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण परदेशी, एसआरए प्रकल्पाचे असिम गुप्ता यांचा समावेश आहे. तसेच अन्न आणि पुरवठा विभागाचे सध्याचे सचिव दीपक कपूर यांच्याही नावाची चर्चा आहे.

Web Title: Strong competition for the post of Managing Director of CIDCO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.