Join us  

रायगडमधील नद्यांच्या खोऱ्यात दमदार पर्जन्यवृष्टी

By admin | Published: June 27, 2016 2:44 PM

रायगड जिल्ह्यातील कुंडलिका, अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास आणि गाढी या सहाही नद्यांच्या खोऱ्यामध्ये अत्यंत दमदार पजर्न्यवृष्टी झाली आहे

उल्हास, पाताळगंगा,सावित्री, कुंडलिका नद्याची जलपातळी पूररेषे कडे सरकू लागली 
जयंत धुळप / दि.27 (अलिबाग)
रायगड जिल्ह्यातील कुंडलिका, अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास आणि गाढी या सहाही नद्यांच्या खोऱ्यामध्ये अत्यंत दमदार पजर्न्यवृष्टी झाली असल्याने, या नद्यांपैकी उल्हास, पाताळगंगा, सावित्री, कुंडलिका या चार नद्याची जलपातळी पूररेषे कडे सरकू लागली असून रायगड जिल्हा प्रशासनाने संबधीत तहसिलदारांना सतर्क राहाण्याच्या सुचना दिल्या आहे. सोमवारी समुद्रास दुपारी 4.30 वाजता भरती आहे आणि याच काळात नदीखो:यात सातत्यपूर्ण पजर्न्यवृष्टी झाल्यास नदी जलपातळीत अधिक वाढ होण्याची शक्यता रायगड पाटबंधारे विभागाच्या सुत्रांनी व्यक्त केली आहे. 
 
नद्यांची सोमवारी सकाळी आठ वाजताची जलपातळी
 
दरम्यान सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोविस तासात, कुंडलिका नदिच्या खोऱ्यात 67 मिमी पावसाची नोंद झाली असून डोलवहाळ(कोलाड) येथे नदी जलपातळी 22.30 मीटर झाली आहे. कुंडलिका नदिची धोकादायक पूर पातळी 23.95 मिटरआहे. सावित्री नदिच्या खोऱ्यात 38 मिमी पावसाची नोंद झाली असून महाड येथे नदी जलपातळी 4.5 मीटर झाली आहे. सावित्री नदिची धोकादायक पूर पातळी 6.50 मिटर आहे. पाताळगंगा नदिच्या खो:यात 30 मिमी पावसाची नोंद झाली असून कलोते(खालापूर) येथे नदी जलपातळी 18 मीटर झाली आहे. पाताळगंगा नदिची धोकादायक पूर पातळी 21.52 मिटर आहे. उल्हास नदिच्या खोऱ्यात 14 मिमी पावसाची नोंद झाली असून कजर्त येथे नदी जलपातळी 42.50 मीटर झाली आहे. उल्हास नदिची धोकादायक पूर पातळी 48.77 मिटर आहे. गाढी नदिच्या खोऱ्यात 32  मिमी पावसाची नोंद झाली असून पनवेल येथे नदी जलपातळी 1.20 मीटर झाली आहे. गाढी नदिची धोकादायक पूर पातळी 6.66 मिटर आहे. अंबा नदिच्या खोऱ्यात 51 मिमी पावसाची नोंद झाली असून नागोठणो येथे नदी जलपातळी 4.25मीटर झाली आहे. अंबा नदिची धोकादायक पूर पातळी 9 मिटर आहे.