मुंबई महानगर प्रदेशात रोड कनेक्टिव्हिटी मजबूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:05 AM2021-06-01T04:05:59+5:302021-06-01T04:05:59+5:30
भिवंडी-कल्याण रोडवरील रजनोली तसेच दुर्गाडी उड्डाणपुलाच्या एका मार्गिकेचे ई-उद्घाटन लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील लांब पल्ल्यातील ...
भिवंडी-कल्याण रोडवरील रजनोली तसेच दुर्गाडी उड्डाणपुलाच्या एका मार्गिकेचे ई-उद्घाटन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील लांब पल्ल्यातील वाढीचे क्षेत्र प्रमुख विकास केंद्र असून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण एमएमआरमधील कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे. याचा कामाचा एक भाग म्हणून करण्यात आले.
एमएमआरडीएने भिवंडी-कल्याण अतिरिक्त रोड एनएच - २२२ वर दुर्गाडी किल्ल्याजवळ उल्हास खाडी ओलांडून सहा लेन पुलाचा आराखडा तयार करून, शिल्लक कामही पूर्ण केले आहे. दुर्गाडी पूल एनएच-२२२ वर स्थित आहे. जो शासनाच्या पीडब्ल्यूडीने बांधला होता आणि २००२ मध्ये पूर्ण झाला. हा उल्हास खाडी पार करून भिवंडी-कल्याण-शीळफाटा रस्ता जोडण्यासाठी आहे. सध्या असलेल्या पुलाला दोन लेन असल्याने, ते व्यस्त एनएच-२२२ आणि शीळफाट्याकडे जाणारी वाढती वाहनांची वाहतूक हाताळू शकत नाही. परिस्थितीवर मात करण्यासाठी एमएमआरडीएने विद्यमान पुलाच्या समांतर अतिरिक्त सहा लेन कॉन्फिगरेशनसह नवीन पूल बांधण्याचा प्रस्ताव दिला जेणेकरून एकूण आठ लेन पूल वाहनचालकांना उपलब्ध होईल.
उल्हास खाडी ओलांडून एनएच-२२२ वर दुर्गाडी येथे सहा लेन पूल बांधण्याचे काम २७ जून २०१४ रोजी झालेल्या बैठकीत मान्यता मिळाली. प्रस्तावित स्ट्रक्चरल डिझाइन बदलावे लागले. त्यामुळे प्रस्तावित समांतर दुर्गाडी पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी मे, २०१० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मात्र काम वेळेत झाले नाही. परिणामी संबंधित कंत्राटदाराचे कंत्राट संपुष्टात आणण्यात आले. तोपर्यंत २० टक्के काम पूर्ण झाले हाेते. त्यानंतर, ई-निविदा प्रणालीद्वारे एमएमआरडीएने टी ॲण्ड टी यांची नियुक्ती केली. नवीन ठेकेदाराला ८ मार्च २०१९ काम देण्यात आले. आता एकूण ६ लेनपैकी दोन लेन वाहतुकीसाठी खुल्या आहेत.