होर्डिंग्ज असलेल्या इमारतींचे होणार स्ट्रक्चरल आॅडिट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2018 02:04 AM2018-12-06T02:04:11+5:302018-12-06T02:04:18+5:30

मुंबईभर झळकणाऱ्या होर्डिंग्जने मुंबईला बकालच नव्हे, तर धोकादायकही बनविले आहे.

Structural audit of buildings with hoardings will be done | होर्डिंग्ज असलेल्या इमारतींचे होणार स्ट्रक्चरल आॅडिट

होर्डिंग्ज असलेल्या इमारतींचे होणार स्ट्रक्चरल आॅडिट

Next

मुंबई : मुंबईभर झळकणाऱ्या होर्डिंग्जने मुंबईला बकालच नव्हे, तर धोकादायकही बनविले आहे. मोक्याच्या ठिकाणी असलेल्या इमारती, रेल्वे परिसर, गर्दीच्या ठिकाणी लावण्यात आलेले मोठमोठे होर्डिंग्ज कालांतराने धोकादायक ठरत आहेत. त्यामुळे भविष्यात संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी अशा इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात यावे, अशी मागणी पालिका महासभेपुढे करण्यात आली आहे.
मुंबईला विद्रूप करणाºया जाहिरातबाजांवर अंकुश आणण्यासाठी महापालिकेने नवीन धोरण आणले. मात्र, उच्च न्यायालयाने अनेक वेळा फटकारल्यानंतरही मुंबईत राजरोस बिनधिक्कत अनधिकृत होर्डिंग्ज झळकत आहेत. या गंभीर प्रश्नाकडे ‘लोकमत’ने वृत्ताद्वारे लक्ष्य वेधले आहे. सण-उत्सव, समारंभ, मतदारांना खूश करण्यासाठी राजकीय पक्ष फलकबाजी करीत असतात. मात्र, काही राजकीय, तसेच व्यवसायिक फलक नियमांचे उल्लंघन करीत मोठमोठ्या इमारती, रेल्वे परिसरात व झाडांवरही लावण्यात येतात.
यापैकी काही होर्डिंग्जला पालिकेच्या परवाना मिळाला असला, तरी बहुतांशी होर्डिंग्ज अनधिकृतच असतात. अशा होर्डिंग्जमुळे अपघाताचा धोका संभावतो. माहिम येथील एक इमारत कमकुवत होऊन कोसळण्यास त्यावरील होर्डिंग्ज जबाबदार ठरले होते. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मोठे होर्डिंग्ज असलेल्या इमारतींच्या स्ट्रक्चरल आॅडिटची मागणी भाजपा नगरसेवक संदीप पटेल यांनी महासभेपुढे ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे. पालिका महासभेच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव आयुक्तांकडे अभिप्रायासाठी पाठविण्यात येणार आहे.
पालिकेच्या नियमानुसार, शहरात २० बाय १० फूट तर उपनगरांमध्ये ४० बाय ४० फूट आकाराच्या होर्डिंग्जला परवानगी देण्यात येते.
रेल्वेच्या हद्दीतील जाहिरात फलक कोसळून पुणे येथे झालेल्या अपघातात पाच नागरिकांचा मृत्यू झाला. मुंबईतही असे अनेक होर्डिंग्ज नियमांचे उल्लंघन करून धोकादायक स्थितीत उभे आहेत. त्यामुळे अशा सर्व ठिकाणी असलेले अधिकृत होर्डिंग्ज सुरक्षित असल्याची झाडाझडती महापालिकेने घेतली होती.
जाहिरात फलकांना झाकणाºया झाडांच्या फांद्या छाटण्यापूर्वी महापालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे, नवीन धोरणात बंधनकारक करण्यात आले आहे.
>होर्डिंग्जवर करण्यात आलेली कारवाई
(जानेवारी ते आॅक्टोबर २०१८)
प्रकार राजकीय व्यवसायिक धार्मिक
बॅनर ३,६२४ १,०९५ १,८२९
बोर्ड २८४ ३२ १६७
पोस्टर्स ० ४३० २५
झेंडे ९८६ ० ०
एकूण ४,९१६ १,५५७ २,०२१

Web Title: Structural audit of buildings with hoardings will be done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.