Join us

भारतीय अर्थव्यवस्थेचे संरचनात्मक पुनरुज्जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2021 4:23 AM

अर्थसंकल्प प्रतिक्रियासाेमवारी जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पामुळे कोरोनानंतर भारतीय अर्थव्यवस्थेचे संरचनात्मक पुनरुज्जीवन होईल. अर्थसंकल्पात शेतीपासून पायाभूत सुविधांपर्यंत आणि आरोग्यसेवा, ...

अर्थसंकल्प प्रतिक्रिया

साेमवारी जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पामुळे कोरोनानंतर भारतीय अर्थव्यवस्थेचे संरचनात्मक पुनरुज्जीवन होईल. अर्थसंकल्पात शेतीपासून पायाभूत सुविधांपर्यंत आणि आरोग्यसेवा, डिजिटल ते आर्थिक समावेशापर्यंत महत्त्वाच्या स्तंभांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. माननीय अर्थमंत्र्यांनी सांगितले की, भारताला ५ ट्रिलियन लक्ष्य गाठण्यासाठी उत्पादन क्षेत्राला दुहेरी आकड्यांमध्ये वाढ करावी लागेल.

- सॅम चेरियन,

संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक, शेवरन लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड

रेल्वेसाठी १ लाख कोटी, पण महाराष्ट्राला काय?

केंद्र सरकारचा रेल्वे अर्थसंकल्प पूर्वी १ दिवसाचा असायचा, पण आता केवळ ५ मिनिटांमध्ये सादर झाला. पूर्वी राज्यानिहाय रेल्वेची तरतूद सांगितली जात असे. आता केवळ १ लाख दहा कोटींच्या एकूण तरतुदीबद्दल सांगण्यात आले, मात्र त्याची सविस्तर माहिती मिळाली नाही. एकूणच केंद्राने रेल्वेला कमी महत्त्व दिले आहे. गेल्या काही वर्षांत रेल्वे प्रकल्पांच्या घोषणा करण्यात आल्या, त्या आता मार्गी लागतील अशी अपेक्षा होती. त्यावर कोणतेही भाष्य करण्यात आले नाही. सीएसएमटी ते कसारा पाचवी आणि सहावी मार्गिका, विरार-डहाणू तिसरी आणि चौथी मार्गिका, एमयूटीपी ३ आणि ३ ए हे प्रकल्प रखडले आहेत. त्याचा विचार व्हायला हवा होता. रेल्वेसाठी तरतूद केली आहे, पण महाराष्ट्राला काय असा प्रश्न आहे.

- नंदकुमार देशमुख,

अध्यक्ष, उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ

--------------------