Join us

एसटीचा चालक सुरक्षित; वाहक मात्र धोक्यातच

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 6:29 PM

एसटी महामंडळाच्या एसटी बस चालकाच्या कॅबिनचा दरवाजा पारदर्शक प्लास्टिक शिल्ड लावून बंदिस्त करण्याची सुरुवात केली आहे.

 

 मुंबई : एसटी महामंडळाच्या एसटी बस चालकाच्या कॅबिनचा दरवाजा पारदर्शक प्लास्टिक शिल्ड लावून बंदिस्त करण्याची सुरुवात केली आहे. यातून चालकाचा थेट संबंध प्रवाशांनी येत नाही. मात्र वाहकांचा प्रवाशांशी वारंवार संबंध येतो, मात्र त्यासाठी कोणतीही अत्यावश्यक सामग्री देण्यात आली नाही. त्यामुळे वाहक अजूनही कोरोनाच्या धोक्यातून सेवा देत आहेत.

लॉकडाऊन काळात एसटी महामंडळाच्या वतीने अत्यावश्यक सेवा दिली जात आहे. कोरोनाच्या संसर्गाचा धोका पत्करून एसटी बसचे चालक-वाहक अत्यावश्यक सेवा देत आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी एसटी महामंडळाने बेस्टसारखी संकल्पना तयार केली आहे. चालकाच्या मागच्या सीटवर पारदर्शक सुरक्षा कवच व्यवस्था करण्यात आली आहे. ज्यामुळे प्रवासी आणि चालकाचा संपर्क होणार नाही. बेस्ट प्रशासनानंतर एसटी महामंडळ देखील अशी संकल्पना एसटी बसला केली आहे. मात्र वाहकांना मास्क, सॅनिटायझरचा पुरवठा अल्प प्रमाणात होत आहे. या व्यतिरिक्त कोणतीही अत्याधुनिक सामग्री वाहकाला दिली जात नाही, अशी माहिती एसटी कामगार संघटनेच्यावतीने दिली.

तिकीट आणि पैशाची देवाणघेवाण करताना वाहकाचा थेट संबंध प्रवाशांशी येतो. त्यामुळे वाहकाला तोंडाला लावले जाणारे प्लास्टिक शिल्ड, हॅन्ड ग्लोज, उत्तम प्रकारचे मास्क देणे आवश्यक आहे. एसटी महामंडळाकडून आदेश देण्यात येतात, मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही, अशी माहिती महाराष्ट्र एस टी वर्कर्स काँग्रेस (इंटक)चे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी दिली.  

 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस