एसटीच्या गणपती विशेष फेऱ्या आज दुपारी ३ नंतर धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 05:06 AM2018-09-10T05:06:16+5:302018-09-10T05:06:20+5:30

भारत बंदच्या पार्श्वभूमीवर संभ्रमावस्थेत असलेल्या नागरिकांना एसटी महामंडळाने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.

ST's Ganpati special round will run after 3 pm this afternoon | एसटीच्या गणपती विशेष फेऱ्या आज दुपारी ३ नंतर धावणार

एसटीच्या गणपती विशेष फेऱ्या आज दुपारी ३ नंतर धावणार

Next

मुंबई : भारत बंदच्या पार्श्वभूमीवर संभ्रमावस्थेत असलेल्या नागरिकांना एसटी महामंडळाने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. सोमवारी पुकारण्यात आलेल्या भारत बंदच्या हाकेमुळे १० सप्टेंबरला सकाळी निघणाºया ‘गणेशोत्सव जादा एसटी’ दुपारी ३ वाजेनंतर मार्गस्थ होणार असल्याचे परिवहनमंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी सांगितले.
गणेशोत्सव काळातील प्रवाशांची गर्दी लक्षात घेता एसटी महामंडळाने जादा गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सोमवारी, १० सप्टेंबरपासून मुंबई आणि ठाणे विभागातून ३५० जादा एसटी रवाना होणार होत्या. मात्र, भारत बंदच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सकाळी मार्गस्थ होणाºया जादा एसटी फेºया दुपारी ३ वाजल्यानंतर निघतील.
दरम्यान, भाविकांनी कोणतीही काळजी न करता प्रवास करावा, असे आवाहन मंत्री रावते यांनी केले आहे.
>350 जादा एसटी मुंबई आणि ठाणे विभागातून रवाना होणार

Web Title: ST's Ganpati special round will run after 3 pm this afternoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.