मुंबई : कोरोनामुळे एसटीला मोठा फटका बसला आहे. प्रवाशांनी खचाखच भरलेल्या एसटी बसचे वैभव पुन्हा प्राप्त करण्यासाठी एसटी महामंडळ प्रयत्न करीत आहे. विशेष म्हणजे राज्यात आणि परराज्यातही या बस धावत आहेत. मात्र, प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे मुंबई विभागातील एसटीचे सीमोल्लंघनच झाले नाही.
मुंबई विभागातत एकूण पाच आगारातून ३७५ बस चालविल्या जातात. मात्र, सध्या ३७५ बस सुरू आहेत. पाच आगारातून राज्यासह परराज्याच्या सीमा ओलांडून धावणाऱ्या बस होत्या. मुंबई विभागांतून दहा बस सुरू होत्या. पण, दीड वर्षात कोरोनामुळे पाचही आगाराची वाताहत झाली आहे. सध्या केवळ पाच आगारातून ११२५ फेऱ्या होत असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, परराज्यातील बस सुरू करण्याचे आदेश देण्यात आलेले नसल्याने पाचही आगाराच्या बस सध्या केवळ महाराष्ट्र राज्याच्या विविध भागातून धावत असल्याची माहिती देण्यात आली आहे. येत्या काळात कर्नाटक, तेलंगणा, गोवा राज्याकडे धावणाऱ्या बस सुरू झाल्यास एसटीचे नुकसान भरून निघण्यास मदत होणार असल्याचा विश्वास अधिकारी वर्तवीत आहेत.
दुसऱ्या राज्यातील प्रवासी मिळेनात
मुंबई येथून तेलंगणा, गोवा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आदी राज्यात बस वाहतूक होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बससेवा बंद करण्यात आली होती. मात्र, आता बससेवा पूर्ववत करण्यात आली आहे. राज्यात बाहेरील गाड्यांना प्रवासी मिळत नसल्याने त्या गाड्या बंद आहेत.
वरिष्ठ अधिकारी, एसटी महामंडळ
९५ टक्के अधिकारी कर्मचाऱ्यांचे लसीकरण
मुंबई विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांपैकी जवळपास ९५ टक्के अधिकारी आणि कर्मचारी यांचे लसीकरण झाले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.