Join us

लॉकडाऊन मध्ये अडकलेल्या नागरिकांकडून एसटीचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2020 7:03 PM

एसटी महामंडळाकडून ५० बस सोडल्या 

 

मुंबई : लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या मजूर, विद्यार्थी आणि इतर प्रवाशांच्या वाहतुकीसाठी प्रासंगिक करारावर एसटी बस चालविण्यात आल्या. नागरिकांकडून सर्व परवानगी घेऊन एसटी बस आरक्षित केल्या. एसटी महामंडळाकडून ५० बस इच्छितस्थळी बस चालविण्यात आल्या आहेत.

राज्यात प्रत्येक ठिकाणी विदयार्थी, मजूर अडकलेले आहेत. यांच्याकडून एसटीने राज्यांतर्गत ३७ बस आणि परराज्यातील वेगवेगळ्या भागात १३ बस चालविल्या. अशा सुमारे ५० बस चालविल्यात आल्या.प्रत्येक बस मध्ये २०-२५ प्रवासी प्रवास करत होते. २०-२५ च्या समूहाने संबंधित अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन या बस चालविण्यात आल्या. या बस मधून प्रवास करताना फिजिकल डिस्टन्स पाळण्यात आले. या सर्व बस १ मे ते ४ मे च्या कालावधीत चालण्यात आल्या. फक्त गोंदिया ते नागपूर बस २९ मार्च रोजी चालविण्यात आली, अशी माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांने दिली. 

 ------------------------

सिंधुदुर्ग मधील सावंतवाडी येथून उत्तरप्रदेश येथे एक बस चालविण्यात आली. बुलढाणा विभागातील शेगाव येथून राजस्थानसाठी एक बस चालविण्यात आली. गोंदिया ते तेलंगणा दरम्यान ७ बस चालविण्यात आल्या.  नागपूर ते हरियाणा, अहमदनगर ते उत्तरप्रदेश प्रत्येकी एक बस चालविण्यात आली. हिंगोली येथून राज्यस्थानमधील भिलवाडा आणि नागोरी येथे प्रत्येकी एक बस चालविण्यात आली. 

-------------------------------

पालघर विभागाच्या जव्हार आगारातील गोंदे येथून वसईसाठी ५ बस चालविण्यात आल्या. अमरावती विभागातून वेगवेगळ्या मार्गावरून अकोलासाठी ११ बस चालविण्यात आल्या. गोंदिया ते नागपूर, गडचिरोली ते नागपूर प्रत्येकी २ बस चालविण्यात आल्या. गंगापूर ते यवतमाळ ११ बस, कमलेश्वर ते नागपूर ५ बस, खुमारी ते नागपूर रेल्वे स्थानक येथे एक बस चालविण्यात आली.   

-------------------------------  

 

टॅग्स :कोरोना सकारात्मक बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्या