एसटीचा प्रवासी, कर्मचाऱ्यांच्या जिवाशी खेळ अजूनही सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 12:32 AM2020-09-07T00:32:58+5:302020-09-07T00:33:10+5:30

सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा, मिळेना सॅनिटायझर

ST's passenger, the game with the staff's soul is still going on | एसटीचा प्रवासी, कर्मचाऱ्यांच्या जिवाशी खेळ अजूनही सुरूच

एसटीचा प्रवासी, कर्मचाऱ्यांच्या जिवाशी खेळ अजूनही सुरूच

googlenewsNext

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सहा महिन्यांपासून बंद असलेली एसटीची वाहतूक २० आॅगस्टपासून सुरू झाली. पण एसटीच्या प्रवासात प्रवाशांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर, मास्क आदी गोष्टी मिळत नाहीत.

एका कर्मचाºयाने सांगितले की, कोरोनामुळे मार्चपासून एसटीची जिल्हांतर्गत वाहतूक बंदी होती. जिल्हांतर्गत एसटी सेवा बंद असल्याने नागरिक हैराण झाले होते. परंतु, राज्य सरकारने आंतरजिल्हा एसटी सेवा पुन्हा तब्बल सहा महिन्यांनंतर सुरू केली. एसटी प्रवासादरम्यान प्रवाशांना काही नियम आणि अटींचं पालन करणे गरजेचे होते. त्याची नियमावली एसटी महामंडळाने जाहीर केली होती. सोशल डिस्टन्सिंग पाळायला हवे होते. एसटीमध्ये २२ प्रवासी घेण्यात येत होते, पण दादर-पनवेल एसटीमध्ये सायन आणि पनवेलपर्यंत ५२ प्रवासी झाले होते.

प्रवासी आपल्या उतरण्याच्या ठिकाणी आल्यानंतर दरवाजाजवळ गर्दी करतात. तर काही प्रवासी मास्क न घालता चढतात, वाहक ओरडल्यानंतर मास्क घालतात. तर काही जण एसटीमध्ये बसल्यानंतर पुन्हा मास्क खाली घेतात. तसेच एसटी प्रशासनाकडून कर्मचाºयांकडेही दुर्लक्ष केले जात आहे.

२० आॅगस्टपासून जिल्हाअंतर्गत एसटी सेवा सुरू झाली तेव्हा सोशल डिस्टन्सिंगसाठी एसटीत ४४ ऐवजी २२ प्रवासी घेण्यात येत होते. पण आता पूर्ण ४४ प्रवासी आणि ११ उभे प्रवासी घेण्यास सांगण्यात आले आहे. तसेच कर्मचाºयांना मास्क आणि सॅनिटाझर उपलब्ध होत नाही त्यामुळे आम्ही विकत घेतो, हा आमच्या जिवाशी खेळ आहे.
- वाहक, एसटी महामंडळ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गाडीचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करायला हवे, पण त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. दिवसातून एक किंवा दोन वेळा गाडीचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. हे प्रवासी आणि कर्मचाºयांसाठी धोकादायक आहे, त्यातून कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे.
- वाहक, एसटी महामंडळ

प्रवाशांनी स्वत:ची काळजी घ्यावी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क आवश्यक आहे. पण प्रवासी मास्क न घालता वाहकाशी वाद घालतात, तसेच जागा पूर्ण भरली सांगितले, तर वाचकाला दमदाटी करतात हे चुकीचे आहे. प्रवाशांनी काळजी घ्यावी, मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे.
- गजानन लाड, प्रवासी

काय होती एसटीची नियमावली
च्प्रवाशांच्या मागणीनुसार फेºयांची वारंवारता ठरवणार.
च्प्रवासी बसचे निर्जंतुकीकरण करणार.
च्प्रसाधनगृह, प्रतीक्षालये, बसस्थानक, आरक्षण कक्ष, चौकशी कक्ष वेळोवेळी स्वच्छता करणार.
च्सीसीटीव्ही कॅमेरे लावून गर्दीवर नियंत्रण ठेवणार.
च्बसस्थानक, बसमध्ये सोशल डिस्टन्सिंग ठेवून प्रवासाची मुभा.
च्बसला दोन दरवाजे असल्यास पुढील दरवाजाचा उतरण्यासाठी तर मागील दरवाजाचा चढण्यासाठी उपयोग.
च्कर्मचाºयांनी कामावर मास्क सॅनिटायझर वापरावे.
च्प्रवाशांना विनामास्क प्रवास करण्यास मनाई.
च्बसमध्ये चढताना आणि उतरताना सोशल डिस्टन्सिंग पाळणार.
च्सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी बस आणि बसस्थानकात खबरदारी घेणार.
च्प्रवाशांनी अल्पोपहार, जेवणाची स्वत: व्यवस्था करावी.
च्प्रवाशांनी बस आणि बसस्थानकात थुंकू नये.
च्प्रवाशांनी बस आणि बसस्थानकात कचरा फेकू नये, कचरा कुंडीचा वापर करावा.
च्बसस्थानकावर आवश्यक गर्दी टाळावी, तसेच कामाशिवाय जास्त वेळ थांबू नये.
च्कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकार आणि एसटी महामंडळाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे.

Web Title: ST's passenger, the game with the staff's soul is still going on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.