Join us  

एसटीची ‘शांतीत क्रांती,’ पाच हजार ईव्ही बसेससाठी मागविल्या निविदा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2023 1:28 AM

मुंबई, पुणे विभागात काही कामे सुरूदेखील झाली आहेत; पण छत्रपती संभाजीनगर, पुणे, अमरावती, नाशिक विभागात चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी निविदा मागवल्या आहेत.

मुंबई :  एसटीच्या ताफ्यात ५ हजार १५० इलेक्ट्रिक बसेसचा समावेश करण्याची घोषणा शासनाने होती. त्यानुसार, एसटीकडून बसेस भाडेतत्त्वावर घेण्याची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यापूर्वी राज्यात या बसेससाठी १७५ डेपो वा आगारात चार्जिंग स्टेशन  उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

१७५ डेपो वा आगारात चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम सुरू

     चार्जिंग स्टेशनसाठी निविदा मागविल्या     छत्रपती संभाजीनगर, पुणे, अमरावती, नाशिक

मुंबई, पुणे विभागात काही कामे सुरूदेखील झाली आहेत; पण छत्रपती संभाजीनगर, पुणे, अमरावती, नाशिक विभागात चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी निविदा मागवल्या आहेत. एसटी’कडून भाडेतत्त्वावर घेतल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक बसेसला चार्ज करण्यासाठी डेपो वा आगारात उच्च दाबाची वीज जोडणी लागणार आहे. 

त्यामुळे महामंडळाकडून राज्यभरातील सगळ्या विभाग नियंत्रकांना असे केंद्र उभारण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यात उच्च दाबाच्या वीज जोडणीसाठी विभागातील कनिष्ठ अभियंत्यांना (इलेक्ट्रिकल) आवश्यक सूचना करायच्या आहेत. 

    इलेक्ट्रिक बसेसचे परिचालन जास्त अपेक्षित असलेल्या भागातील चार्जिंग स्टेशनवर  जास्त चार्जिंग पाॅईंट तर कमी परिचालनाच्या ठिकाणी कमी चार्जिंग पाॅईंट अपेक्षित आहेत. 

    चार्जिंग करताना अनुचित प्रकार घडू नये, अशा जागा निवडून तेथे सुरक्षेची आवश्यक काळजीही घ्यायची आहे.

    चार्जिंग स्टेशन होणार असल्याने आता लवकरच राज्यात इलेक्ट्रिक बस धावण्याचे संकेत मिळत आहेत.

टॅग्स :एसटी