Join us

एसटीची 'स्मार्ट कार्ड' योजना आजपासून कार्यान्वित, ज्येष्ठ नागरिकांच्या नोंदणीस प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2019 3:53 PM

मुंबई सेंट्रल आगारातुन पहिले स्मार्ट कार्ड घेणारे प्रवासी विनायक कांशीराम गुरव , वय ७०यांना स्मार्ट  कार्ड नोंदणीची पावती प्रदान करण्यात आली.

मुंबई  : एसटी महामंडळातर्फे बहुचर्चित स्मार्ट कार्ड  काढण्याचा शुभारंभ एस टी च्या मुंबई विभागाचे विभाग नियंत्रक शैलेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ,  विभागीय सांख्यकि अधिकारी एकनाथ मगदूम व आगार प्रभारक श्रीरंग बरगे  यांच्या उपस्थितीत  आज ज्येष्ठ नागरिकांची नाव नोंदणी करून संपन्न  झाला.

मुंबई सेंट्रल आगारातुन पहिले स्मार्ट कार्ड घेणारे प्रवासी विनायक कांशीराम गुरव , वय ७०यांना स्मार्ट  कार्ड नोंदणीची पावती प्रदान करण्यात आली. शासनाने विविध सामाजिक घटकांना एसटीमधून प्रवासाची सवलत दिली आहे , परंतु बनावट कार्ड वापरून अनेकजण या योजनेचा लाभ घेत असल्याचे  निदर्शनास आल्याने परिवहन मंत्री व एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष  दिवाकर रावते पुढाकाराने व संकल्पनेतुन एसटी महामंडळाने स्मार्ट  कार्ड धारकांना आधार क्रमांकाशी निगडित असलेली स्मार्ट कार्ड योजना कार्यान्वित करण्याचे ठरवले.

त्यानुसार आज मुंबई सेंट्रल आगारातून ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड देण्याचा योजनेचा शुभारंभ झाला यासाठी ज्येष्ठ नागरिकांना अंगठ्याचा ठसा स्क्यनरवर ठेऊन आधार कार्डसी संलग्न माहिती प्राप्त झाल्यानंतर  नाव नोंदणी करता येईल व पंधरा दिवसांनी नोंदणी केलेल्या ठिकाणी कार्ड प्राप्त होईल. आगारातील आरक्षण खिडकीवर नागरिकांनी नाव नोंदणी करावी. नाव नोंदणी करीत असताना स्मार्ट कार्डसाठी पंचावन्न रुपये इतके शुल्क घेण्यात येत असून त्या नंतर  तयार स्मार्ट कार्ड त्यांना देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ जेष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आगार व्यवस्थापक सुनील पवार यांनी केले आहे.

टॅग्स :मुंबईराज्य परीवहन महामंडळ