सोशल मीडियावर एसटीचा ‘प्रवास’, ट्विटर अकाउंट होणार पुन्हा सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 03:59 AM2017-08-24T03:59:33+5:302017-08-24T03:59:38+5:30

प्रसार माध्यमांप्रमाणे समाज माध्यमांचा (सोशल मीडिया) वापर दैनंदिन जीवनात अत्यंत महत्त्वाचा झाला आहे. या धर्तीवर सार्वजनिक सेवा पुरविणा-या संबंधितांना जनतेशी जवळीक साधण्यासाठी, टि्वटर, फेसबुक अशा समाज माध्यमांचा वापर करण्याच्या सूचना आहेत.

STT 'travel' on social media, Twitter account will be active again | सोशल मीडियावर एसटीचा ‘प्रवास’, ट्विटर अकाउंट होणार पुन्हा सक्रिय

सोशल मीडियावर एसटीचा ‘प्रवास’, ट्विटर अकाउंट होणार पुन्हा सक्रिय

Next

- महेश चेमटे।

मुंबई : प्रसार माध्यमांप्रमाणे समाज माध्यमांचा (सोशल मीडिया) वापर दैनंदिन जीवनात अत्यंत महत्त्वाचा झाला आहे. या
धर्तीवर सार्वजनिक सेवा पुरविणा-या संबंधितांना जनतेशी जवळीक साधण्यासाठी, टि्वटर, फेसबुक अशा समाज माध्यमांचा वापर करण्याच्या सूचना आहेत. त्या धर्तीवर राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) ही सोशल मीडियावर वेगवान प्रवास करण्यासाठी सज्ज
होत आहे.
एसटीच्या कॉलसेंटरसह सोशल मीडिया सेल येत्या आॅक्टोबरपासून कार्यान्वित होणार आहे. परिणामी, अखेर आॅक्टोबरमध्ये सोशल मीडियाला मुहूर्त मिळल्याची चर्चा एसटीच्या वरिष्ठ अधिकाºयांमध्ये रंगली आहे.
‘गाव तेथे एसटी’ या ध्येयाप्रमाणे राज्याच्या खेडोपाडी एसटी
सेवा पोहोचली आहे. एसटी प्रवाशांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी
आणि अडचणी सोडविण्यासाठी माहिती केंद्र (कॉलसेंटर)
सुरू करण्यात येणार आहे. परिवहनमंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी ८ जुलै रोजी माहिती केंद्रबाबतचा निर्णय घोषित केला होता. हे कॉलसेंटर २४ तास कार्यान्वित असेल, असे ही रावते यांनी सांगितले होते. आता कॉलसेंटरसह सोशल मीडियाही आॅक्टोबरमध्ये सुरू होणार आहे.
एसटीचे टिष्ट्वटर अकाउंट मार्च २०१५ साली सुरू करण्यात आले होते. ‘एम.एस.आर.टी. कॉर्पोरेशन’ नावाने हे अकाउंट सुरू करण्यात आले होते. टिष्ट्वटरवरील या अकाउंटवर एसटी महामंडळाचा लोगोदेखील दिसत आहे. एसटीच्या अकाउंटला टिष्ट्वटरकरांनी भराभर फॉलो करण्यास सुरुवात केली. एसटीच्या या बंद अकाउंटचे ५८८ फॉलोअर्स आहेत.

एसटी प्रवाशांच्या अडचणी सोडविण्यासाठी आणि तक्रारींचे निरसन करण्यासाठी आॅक्टोबर महिन्यात एसटीचे कॉलसेंटर सुरू होणार आहे. त्याचबरोबर, एसटीचे अधिकृत फेसबुक, टिष्ट्वटर आणि इन्स्टाग्राम अकाउंटदेखील सुरू होणार आहे.
- रणजित सिंह देओल,
उपाध्यक्ष, एसटी महामंडळ

Web Title: STT 'travel' on social media, Twitter account will be active again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.