खालापूर : तालुक्यातील साजगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सारसन येथील जिल्हा परिषदेची शाळा व अंगणवाडीसमोर पावसाचे पाणी साचल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले असून शाळेसमोर असलेल्या मैदानावर माती टाकून खड्डा बुजविण्याच्या मागणीकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही त्रास सहन करावा लागत आहे.खालापूर तालुक्यातील सारसन येथे जिल्हा परिषदेची चौथीपर्यंतची शाळा आहे. शाळेच्या बाजूलाच अंगणवाडीची इमारत आहे. शाळा व अंगणवाडीसमोर मोठे मैदान असून या मैदानातील खोलगट भागात पावसाचे पाणी साचून या मैदानाचे रूपांतर तळ्यात झाले आहे. यामुळे डासांची निर्मिती होऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय पावसाचे पाणी साचल्याने अंगणवाडी व शाळेतील विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदान अपुरे पडत आहे. साजगाव ग्रामपंचायतीने याची दखल घेऊन, हा खड्डा बुजवावा अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)
सारसन अंगणवाडीसमोर साचले पाणी
By admin | Published: June 25, 2015 11:01 PM