विद्यार्थ्यावर अत्याचार करणाऱ्यास अटक
By Admin | Published: April 13, 2015 01:22 AM2015-04-13T01:22:42+5:302015-04-13T01:22:42+5:30
जात पडताळणी प्रमाणपत्राप्रकणी न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा पहिला फटका अंबरनाथमध्ये शिवसेनेला तर बदलापूरात भाजपाला बसला अहे. जात पडताळणी प्रमाणपत्र न जोडणाऱ्या उमेदवारांसंदर्भात कल्याण
अंबरनाथ: जात पडताळणी प्रमाणपत्राप्रकणी न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा पहिला फटका अंबरनाथमध्ये शिवसेनेला तर बदलापूरात भाजपाला बसला अहे. जात पडताळणी प्रमाणपत्र न जोडणाऱ्या उमेदवारांसंदर्भात कल्याण कोर्टाने निर्णय देऊन हे अर्ज स्वीकारण्याचे आदेश दिले. या आदेशामुळे यापूर्वी अंबरनाथमध्ये शिवसेनेच्या एका तर बदलापुरात भाजपाच्या एका बिनविरोध निवडून आलेल्या जागेवर निवडणूक होणार आहे. न्यायालयाच्या या आदेशामुळे अंबरनाथमध्ये शिवसेनेचा तर बदलापूरात भाजपाचा जीव टांगणीला लागला आहे.
अंबरनाथच्या प्रभाग क्रमांक ६ खामकरवाडी परिसरातून अपक्ष उमेदवारी दाखल करणाऱ्या गुंजाळ साईनाथ यांचा उमेदवारी अर्ज जात पडताळणी प्रमाणपत्रा अभावे अवैध ठरविण्यात आला. हाच प्रकार बदलापुरात प्रभाग क्रमांक ३४ मध्ये घडला. राष्ट्रवादीच्या ललिता जाधव यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. या दोन उमेदवारांसह इतर १५ उमेदवारांनी न्यायालयात दाद मागितली होती. या प्रकरणी निकाल लागण्या आधीच उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अंबरनाथमध्ये बिनविरोध निवडणुका जिंकण्यासाठी शिवसेनेने सर्वेतोपरी प्रयत्न केले. त्यात त्यांना यशही लाभले. अंबरनाथमध्ये शिवसेनेने ४ तर काँग्रेसने एक जागा बिनविरोध जिंकली होती. तर बदलापूरात भाजपाने तीन तर शिवसेनेने दोन जागा जिंकल्या होत्या. मात्र न्यायालयाने जात पडताळणी प्रमाणपत्रासंदर्भात निकाल देतांना ज्यांचे अर्ज जात पडताळणी प्रमाणपत्राअभावे अवैध ठरविले त्यांचे अर्ज पुन्हा स्वीकारण्याचे आदेश आले. या आदेशामुळे अंबरनाथच्या प्रभाग क्रमांक ६ मध्ये अपक्ष उमेदवार साईनाथ गुंजाळ हे पुन्हा निवडणूकीच्या रिंगणात आले आहे. त्यामुळे बिनविरोध ठरलेल्या शिवसेनेच्या एका जागेवर निवडणूक होणार आहे. या प्रभागातून शिवसेना पुरस्कृत निखील वाळेकर हे निवडणूक रिंगणात आहेत.
तर बदलापुरातही प्रभाग क्रमांक ३४ मध्ये असाच प्रकार घडला आहे. या प्रभागातुन शिवसेनेच्या उमेदवार सुनिता चव्हाण यांनी माघार घेतल्याने भाजपाच्या वैशाली गीते यांची बिनविरोध निवडण झाली होती. मात्र न्यायालयाच्या आदेशानंतर राष्ट्रवादीच्या ललिता जाधव ह्या रिंगणात आल्याने या प्रभागातही निवडणूक होणार आहे. ज्या जागा बिनविरोध गणल्या गेल्या त्या जागेवर न्यायालयाच्या आदेशानंतर उमेदवार रिंगणात परत आले आहेत. ज्या उमेदवारांचे अर्ज आदेशानंतर वैध ठरले आहे त्या अंबरनाथ बदलापुरातील १७ उमेदवारांना माघार घेण्याची संधी सोमवार १३ एप्रिलपर्यंत देण्यात आली आहे. अंबरनाथमध्ये अपक्ष उमेदवार गुंजाळ आणि बदलापुरात राष्ट्रवादीच्या उमेदवार ललिता जाधव यांनी माघार न घेल्यास या जागेवर २२ एप्रिलला निवडणूक होईल.