बारावीत दोनदा नापास झाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:36 AM2021-02-05T04:36:57+5:302021-02-05T04:36:57+5:30
कांदिवलीती मधील प्रकार लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : बारावीच्या वर्गात दोन वेळा अपयशी झाल्याच्या तणावात एका विद्यार्थ्यांने आयुष्य संपविल्याची ...
कांदिवलीती मधील प्रकार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बारावीच्या वर्गात दोन वेळा अपयशी झाल्याच्या तणावात एका विद्यार्थ्यांने आयुष्य संपविल्याची घटना बुधवारी घडली, तर बेरोजगारीला कंटाळून एकाने आयुष्य संपविले असून, याप्रकरणी समतानगर पोलिसांत अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
किसन शर्मा (१९) असे मयत विद्यार्थ्यांचे नाव आहे. जो कांदिवली पूर्वच्या आकुर्ली परिसरात पालकांसोबत राहत होता. शर्मा हा इयत्ता बारावीच्या वर्गात शिकत होता मात्र दोन वेळा परीक्षा देऊनही तो त्यात अनुत्तीर्ण झाल्याने तणावात होता. बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास याची आई काही कामाने घराबाहेर गेली होती. त्या दरम्यान त्याने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्याची आई घरी परतली तेव्हा सर्व प्रकार उघडकीस आला आणि स्थानिकांनी पोलिसांना कळवले. तर याच दरम्यान कांदिवलीच्या नरसीवाड्यात अभिजित वाडेकर (४०) यांनीही गळफास घेत मृत्यूला कवटाळले. वाडेकर हे बेरोजगार होते, तर त्यांच्या पत्नी एका रुग्णालयात नोकरी करतात. बेरोजगारीमुळे त्यांना निराशा आली होती. त्यानुसार बुधवारी दुपारी त्यांनी मुलीला अंघोळ करतोय असे सांगत घराबाहेर काढले. त्यानंतर गळफास घेतला. याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्या पत्नीचा जबाब घेतला असून सुसाइड नोट सापडलेली नाही. या दोन्ही प्रकरणात प्राथमिक तपासात कोणतीही संशयित बाब आढळलेली नसून अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आल्याचे समतानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदराव हाके यांनी 'लोकमत' शी बोलताना सांगितले.