Join us

नोकऱ्यांसाठी विद्यार्थी काँग्रेसची मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 4:11 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वाढत्या बेरोजगारी विरोधात विद्यार्थी काँग्रेसने ‘नोकरी दो, या डिग्री वापस लो’ या अभियानाची घोषणा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : वाढत्या बेरोजगारी विरोधात विद्यार्थी काँग्रेसने ‘नोकरी दो, या डिग्री वापस लो’ या अभियानाची घोषणा केली आहे. केंद्रातील मोदी सरकारने दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात मात्र खासगीकरणाच्या माध्यमातून असलेल्या स्थायी नोकऱ्यासुद्धा मोदी सरकार नष्ट करत असल्याचा आरोप आझाद मैदान येथील काँग्रेस कार्यालयात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी या अभियानाच्या सुरूवातीला केला. यावेळी अभियानाच्या पोस्टरचे अनावरण ही करण्यात आले. मोदींनी कौशल्य विकासच्या गप्पा मारल्या. या अभियानात किती तरूणांचे कौशल्य विकास झाले, किती व्यावसायिकांना याचा फायदा झाला, याची कोणतीच नोंद नाही, असा आरोपही त्यांनी केला.

या अभियानाबाबत अधिक माहिती देताना विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष प्रद्युमन यादव म्हणाले की, या अभियानांतर्गत ज्या विद्यार्थ्याकडे डिग्री असूनसुद्धा नोकरी नाही, अशा विद्यार्थ्यांने ७२९०८००८५० या मोबाईल क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा. मिस्ड कॉल दिल्यानंतर त्याला एक लिंक पाठवली जाईल. या लिंकवर विद्यार्थ्यांनी आपली माहिती व डिग्रीची सॉफ्टकॉपी अपलोड करावी. यातून बेरोजगार पदवीधर युवकांची एकत्रित माहिती केंद्र सरकारकडे मांडून जाब विचारला जाईल.